आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र सराला बेट येथे योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराज यांची १२० वी पुण्यतिथी व मंदिर जिर्णोद्धार विविध देवता प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्ताने श्री हरिहर महायज्ञ १६ डिसेंबर ते २३ डिसेंबर भव्य आयोजन करण्यात आलेला आहे. त्या कार्यक्रमाचे महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांचे उपस्थितीत धर्म ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, आमदार रमेश बोरणारे, लहु कानडे, सिद्धार्थ मुरकुटे, दीपक पटारे, अशोक कानडे, अविनाश गलांडे, दिनेश परदेशी, साबेरभाई खान, पंकज ठोंबरे, शरद नवले, बाबासाहेब जगताप, बाळासाहेब कापसे, बाबासाहेब चिडे, अशोक बोराडे, बबन मुठे, प्रांताधिकारी अनिल पवार, प्रशांत पवार, सरला बेटाचे विश्वस्त मधुकर महाराज, हजारोंच्या संख्येने ग्रामस्थ भक्त मंडळ उपस्थित होते. श्री क्षेत्र सराला बेट येथे योगीराज गंगागिरी महाराज ब्रह्मलीन नारायणगिरी महाराज अशा अनेक थोर संताची तपोभूमी राहिले आहे. ब्रह्मलीन नारायणगिरी महाराज यांच्या नंतर मठाधीपतीचे सूत्रे महंत रामगिरी महाराज यांच्याकडे आली. त्यांनी २००९ ते २०२२ पर्यंत भव्य मंदिरे उभारून जुन्या मंदिराचा जिर्णोद्धार केला. १५ कोटीचे भव्य दगडी कोरिव मंदिर उभारले घाट बांधणे मंदिर परिसर शुसोभीकरण, असे विविध विकास कामे बेटावर केले.
२३ पर्यंत सोहळा तीन दिवस चालणाऱ्या यज्ञ सोहळ्यात पूजेसाठी जवळपास २ हजार जोडपे बसणार आहेत. ३०० ब्राह्मणवृदांच्या मंत्र उच्चारात पूजा होणार आहे. यासाठी ३ एकर जागेवर यज्ञ मंडपाची उभारणी केली आहे. यज्ञ सोहळ्याला १० ते १२ लाख भाविक भक्त उपस्थित राहणार आहेत. २३ डिसेंबरला महंत रामगिरी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.