आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्री क्षेत्र कुंड माउली मळगंगा मंदिर कलशारोहण प्रथम वर्धापनदिन सोहळा बुधवारी, ८ फेब्रुवारी रोजी साजरा होणार असल्याची माहिती मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे आजी माजी पदाधिकाऱ्यांनी दिली. या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी नुकतीच एक बैठक मळगंगा मंदिरात घेण्यात आली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर कवाद, संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुकाध्यक्ष सचिन वराळ, उपसरपंच माऊली वरखडे, माजी सरपंच ठकाराम लंके,सचिव शांताराम कळसकर,ट्रस्टचे पदाधिकारी ज्ञानदेव लंके, अमृताशेठ रसाळ,रामदास वरखडे, शिवाजीराव वराळ, बजरंग वराळ, ॲड. बाळासाहेब लामखडे, शंकरराव लामखडे, संतोष रसाळ, मनोहर राउत, बबनराव ससाणे व्यवस्थापक महेश ढवळे आदी उपस्थित होते. बुधवारी कलशारोहण प्रथम वर्धापनदिन निमित्त सकाळी ८ ते ९ वाजता पोपट महाराज देशपांडे यांच्या हस्ते देवीची पूजा व अभिषेक करण्यात येणार आहे.
सकाळी १० ते १२ गणेश महाराज वाघमारे यांचे कीर्तन, दुपारी १२ नंतर महाप्रसाद अशाप्रकारे हा कलशारोहण कार्यक्रम होणार आहे. पाच ते सहा हजार भाविक उपस्थित राहतील, असे नियोजन करण्यात येणार आहे. एक वर्षांपूर्वी जगप्रसिद्ध रांजणखळगे परिसरात मळगंगा मंदिराचा कलशारोहण कार्यक्रम झाला होता. जगप्रसिद्ध रांजणखळगे हा राज्याचा पर्यटनदृष्ट्या अमूल्य ठेवा अाहे. या ठिकाणची महती जगभर पसरली आहे. देशविदेशातून पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी येत असतात. मळगंगा देवी जागृत देवस्थान म्हणून राज्यात प्रसिद्ध आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.