आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूर्यनमस्कार:श्रीसमर्थ रामदास स्वामी शक्तीची‎ उपासना करणारे संत : कुलकर्णी‎

नगर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्री समर्थ रामदास स्वामींनी आयुष्यभर‎ सूर्यनमस्कार घालत बलोपासना केली. श्री‎ समर्थ रामदास स्वामी हे भारत व‎ महाराष्ट्रातील एक संत जे बलोपासना करत‎ होते. शक्तीची उपासना करणारे संत श्री‎ समर्थ रामदास स्वामी होते, असे प्रतिपादन‎ दासनवमी उत्सव समितीचे अध्यक्ष श्रीपाद‎ कुलकर्णी यांनी केले.‎ दासनवमीनिमित्त सावेडीतील श्री समर्थ‎ विद्यामंदिर प्रशालेत सूर्यनमस्कार स्पर्धेचा‎ शुभारंभ कुलकर्णी यांच्या हस्ते झाला.‎

त्यावेळी ते बाेलत हाेते. अॅड. किशोर‎ देशपांडे, सुरेश क्षीरसागर, मुख्याध्यापक‎ अजय महाजन, मुख्याध्यापिका संगिता‎ जोशी, पर्यवेक्षिका संगिता सोनटक्के आदी‎ उपस्थित होते. सूर्यनमस्कार स्पर्धेत नगर‎ शहरातील २२ शाळांच्या संघानी सहभाग‎ घेतला. स्पर्धेचे परीक्षण योग विद्या धाम चे‎ जेष्ठ योगशिक्षक कार्याध्यक्ष जयंत वेसीकर‎ व कार्यकारिणी सदस्य माणिक अडाणे,‎ वैशाली एकबोटे यांनी केले. सूत्रसंचालन‎ विवेक भारताल यांनी केले.‎

बातम्या आणखी आहेत...