आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिनविरोध निवड:श्री स्वामी समर्थच्या अध्यक्षपदी नलगे; उपाध्यक्षपदी कोल्हटकर बिनविरोध

​​​​​​​श्रीगोंदे8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील श्री स्वामी समर्थ पतसंस्थेच्या अध्यक्षपदी मच्छिंद्र नलगे तर उपाध्यक्षपदी सागर कोल्हटकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अभिमान थोरात यांनी काम पाहिले.

नंदकुमार तागड, केशवराव कोल्हटकर, शंकरराव इंगवले, अमोल बंडगर, शिवाजीराव गावडे, संदीप कोकाटे, हनुमंत खरात, प्रवीण माने, अर्चना भोसले, छाया गवळी उपस्थित होते. निवडीनंतर बोलताना नूतन अध्यक्ष नलगे म्हणाले, आमचे मार्गदर्शक,संस्थेचे संस्थापक ज्ञानदेव कोल्हटकर यांनी माझ्यावर जबाबदारी टाकली. त्यामुळे सर्वांना विश्वासाने बरोबर घेऊन , सर्वांच्या सहकार्याने, काम करेन. व मिळालेल्या संधीचं सोनं करेन. आबांच्या मार्गदर्शनाखाली व्हा. चेअरमन व संचालक या पदावर विश्वासाने काम केले. म्हणून ही मोठी जबाबदारी आबांनी सोपवली आहे.

बातम्या आणखी आहेत...