आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धर्मांतर व अपहरण:श्रीरामपूर प्रकरणांची एसआयटी चौकशी करावी; भाजपचे आमदार नितेश राणे यांची पत्रकार परिषदेत मागणी

नगर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर जिल्हा धर्मांतराच्या प्रकरणांवरून बदनाम होत आहे. श्रीरामपूर येथील आदिवासी समाजातील दीपक बर्डे या मुलाने मुस्लिम समाजाच्या मुलीची विवाह केल्यानंतर त्याचे अपहरण करण्यात आले. अजूनही या मुलाचा तपास लागलेला नाही. या संपूर्ण प्रकरणाची “आयएएस’ अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करून एसआयटी किंवा सीआयडी चौकशी करावी, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहे. अशी माहिती भाजपचे आमदार नितेश राणे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.

श्रीरामपूर येथे आदिवासी समाजातील दीपक बर्डे अपहरण प्रकरणाच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यानंतर येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री अशोक उईके, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष भैया गंधे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, बाबासाहेब सानप, नरेंद्र कुलकर्णी आदी उपस्थित होते. राणे म्हणाले, जिल्ह्यात काही काळापासून सातत्याने धर्मांतराच्या घटना घडत आहेत. हिंदुत्ववादी संघटना एकत्रित येऊन त्या विरोधात लढत आहेत.

श्रीरामपूर येथील दीपक बर्डे या युवकाचे अपहरण झाले, हे पोलिसांनाही सांगता येत नाही. पोलिसांनी याचा शोध लावला नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने त्याचा शोध लावू. धर्मांतराच्या प्रकरणाबाबत पोलिस ठाण्यात आमचे कार्यकर्ते गेल्यानंतर तक्रारी न घेत नाहीत. आता महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात राहिले नाही. १६६ आमदार हिंदुत्वाच्या मुद्द्यावर, विचारावर एकत्रित येऊन स्थापन झालेले हे सरकार आहे. धर्मांतर अथवा अन्य हिंदुत्वाच्या बाबतीत कुठल्याही विभागाचा अधिकारी यात सहभागी झाल्यास तो परत खुर्चीवर बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

आघाडीत आता फोन उचलणारे राहिले नाही
धर्मांतराच्या प्रकरणात कुणाला जर असं वाटत असेल तर महाविकास आघाडीतील साहेब वाचवतील, फोन करतील. ते होणार नाही. महाविकास आघाडीतील नेत्यांचे कोणी फोन उचलणारे राहिले नाहीत. अर्धे लोक आतमध्ये आहेत, असे नितेश राणे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...