आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्रीरामपूर दुय्यम कारागृह अधिकारी यांची बदली झाल्यानंतर त्यांचे जागेवर अद्याप कारागृह अधिकारी नियुक्त केला गेला नाही. सध्या महसूल विभागाच्या प्रभारी नियुक्त तुरुंग अधिकाऱ्याच्या भरवशावर तुरुंग व्यवस्थापन सुरू आहे. त्यामुळे गृह विभागाने अधिकृत तुरुंग अधिकारी नियुक्त करणे गरजेचे आहे.श्रीरामपूरला दुय्यम कारागृह आहे.या ठिकाणी अतिरिक्त पोलीस अधीक्षक व पोलीस उपअधीक्षक पदे आहेत.श्रीरामपुरात अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर गुन्हे घडत आहेत.त्यामुळे श्रीरामपूर कारागृहात अनेक मोठया गुन्ह्यातील आरोपींना ठेवले जाते.
गृह विभागाचे तुरुंग अधिकारी यांची काही महिन्यांपूर्वी बदली झालेली आहे.त्यानंतर नवीन अधिकारी नियुक्त करणे गरजेचे होते. मात्र नवीन नियुक्ती न होता महसूल विभागातील रेकॉर्ड विभागाचे प्रमुख यांची प्रभारी तुरुंग अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांना त्यांचे काम सांभाळून तुरुंगाचा कार्यभार सांभाळावा लागत आहे.मात्र तुरुंग व्यवस्थापनाचा व कायद्याचा अनुभव नसल्याने अडचणी येत आहेत.
जागा कमी, तुरुंग फुल्ल
श्रीरामपूर कारागृहात पाच बराकी आहेत.त्यातील तीन बराकी पुरुष कैद्यांसाठी आणि एक बराक स्त्री कैद्यांसाठी आहेत. प्रत्येक बराकीची क्षमता तीन आहे. म्हणजे पुरुष बराकीची क्षमता नऊ तर स्त्री बराकीची क्षमता तीन अशी श्रीरामपूर कारागृहाची क्षमता बारा कैद्यांची क्षमता आहे. मात्र अलीकडच्या उपलब्ध माहितीनुसार कारागृहात सध्या ३३ कैदी आहेत.
तुरुंग व्यस्थापन गृह विभागाकडे असावे
कायद्यानुसार कारागृह अधिकारी गृह विभागाचे अधिकारी गृह विभागाचे असतात. मात्र अधीक्षक मात्र तहसीलदार असतात. वास्तविक अधीक्षकपदही गृह विभागाकडे असणे गरजेचे आहे. तहसीलदार यांना महसूल विभागाचा व्याप असल्याने तुरुंगाच्या बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. त्यामुळे तुरुंगात अनेक अपप्रकार घडण्याची शक्यता असते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.