आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक:श्रीरामपूर बाजार समितीची निवडणूक जाहीर होणार नाही

श्रीरामपूर4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाजार समितीची निवडणूक लढवण्यासाठी शेतकऱ्याला आता सदस्य होणे बंधनकारक नाही. राज्याच्या राज्यपालांनी सदस्य नसलेला शेतकरी निवडणूक लढवू शकतो अशी तरतूद बाजार समिती कायदा कलम १३ नुसार केली आहे. यावर २२ नोव्हेंबर रोजी राज्यपालांनी स्वाक्षरी केली. नवीन कायद्याच्या अनुषंगाने राज्यभरातील बाजार समित्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्यासंबंधी शासन अध्यादेश काढू शकते, असे निवेदन मुख्य सरकारी वकील ज्ञानेश्वर काळे यांनी खंडपीठात केले. न्या. मंगेश पाटील व न्या. बाय. जी. खोब्रागडे यांनी श्रीरामपूर बाजार समितीसंबंधीच्या याचिकांवर एक आठवड्यानंतर सुनावणी ठेवली आहे. नवीन नियमांमुळे श्रीरामपूर बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम आता जाहीर होणार नाही. बाजार समितीची निवडणूक घ्यावी यासाठी सदस्य संजय भिसे आणि अविनाश लोखंडे यांनी अॅड. सिद्धेश्वर ठोंबरे यांच्या वतीने याचिका दाखल केली होती, तर दोघा सदस्यांनी निवडणुका घेऊ नये म्हणून खंडपीठात याचिका दाखल केली होती. याचिका सुनावणीस निघाल्यानंतर सरकारी वकिलांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले की, नवीन कायद्यानुसार आता शेतकरी सदस्य नसला तरी निवडणूक लढवू शकतो. त्या अनुषंगाने राज्यभरासाठी अध्यादेश जारी करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...