आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपप्रवृत्तीमुक्त:श्रीरामपूर तालुका अपप्रवृत्तीमुक्त करावा : मुरकुटे

श्रीरामपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात काही अपप्रवृत्ती आहेत. या प्रवृत्ती चुकीचे व निराधार आरोप करुन दिशाभूल करतात. रावण दहन करुन जसे अपप्रवृतीचे दहन केले जाते. तसेच महिषासूरमर्दीनीने राक्षसांचा वध करुन पृथ्वी राक्षसमुक्त केली यासाठी विजयदशमी साजरी केली जाते. याप्रमाणेच तालुक्यातील अपप्रवृत्तीचा बिमोड करारुन तालुका अपप्रवृत्तीमुक्त करावा,असे आवाहन माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी केले.

‘अशोक’ च्या सन २०२२-२३ च्या गळित हंगामाचा बायलर अग्नि प्रदिपन समारंभ माजी आमदार मुरकुटे यांचे अध्यक्षतेखाली तसेच राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे कार्याध्यक्ष अविनाश आपटे यांचे प्रमुख उपस्थितीत झाला. त्याप्रसंगी मुरकुटे बोलत होते.यावेळी कोंडीराम उंडे, रावसाहेब थोरात, ज्ञानदेव साळुंके, सुरेश गलांडे, सोपानराव राऊत, दिगंबर शिंदे,भाऊसाहेब कहांडळ, दत्तात्रय नाईक, बाबासाहेब काळे, हिंमतराव धुमाळ, मंजुश्री मुरकुटे,शितल गवारे,प्रा.सुनीता गायकवाड, ऍड.सुभाष चौधरी, सुभाष पटारे,बाबासाहेब ढोकचौळे, श्रीधर कोलते, भाऊ थोरात आदी उपस्थित होते. मुरकुटे म्हणाले, यंदाच्या गळित हंगामात केन्द्राने एक्सपोर्ट साखरेबाबत जे धोरण स्विकारले ते योग्यच आहे. शुगर निर्मितीमुळे उत्पादन खर्चात क्विंटलमागे २५० ते ३०० रुपयांची बचत होते. यंदाच्या हंगामात शुगर उत्पादनावर भर दिला जाणार असल्याचे मुरकुटे यांनी स्पष्ट केले. संचालक ज्ञानेश्वर काळे व पत्नी सोनाली काळे, जालिंदर दसपुते व त्यांच्या पत्नी शीतल दसपुते यांचे हस्ते पूजन करण्यात आले.

प्रतिदिन एक लाख लिटर इथेना व अल्कोहोल उत्पादन करणार
अशोक कारखाना यंदाच्या गळीत हंगामात प्रतिदिन एक लाख लिटर इथेनाल तसेच प्रतिदिन एक लाख लिटर अल्कोहोल उत्पादन करणार आहे. तसेच काहि प्रमाणात थेट रसापासून प्रायमरी ज्युसापासून इथेनॉल निर्मिती करणार आहे. त्याचप्रमाणे उत्पादन खर्चात मोठी बचत होत असल्याने र शुगरचे उत्पादनवरही भर देण्यात येणार असल्याची माहिती माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...