आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारितोषिकाने सन्मानित:प्रश्नमंजूषा स्पर्धेत श्रीतिलोक जैन विद्यालयाने मारली बाजी

पाथर्डी21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आंतर विद्यालयीन सुवर्णयुग प्रश्नमंजूषा स्पर्धेत पाथर्डी शहरातील श्रीतिलोक जैन विद्यालयाने बाजी मारून प्रथम क्रमांक पटकावला आहे. द्वितीय क्रमांक श्रीस्वामी समर्थ विद्या मंदिराने, तृतीय क्रमांक श्रीविवेकानंद विद्यामंदिरने मिळवला. एम. एम. निऱ्हाळी विद्यालय आणि पद्मभूषण वसंतदादा विद्यालयाने उत्तेजनार्थ पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन प्रांताधिकारी देवदत्त केकाण, उद्योजक डॉ. बंडू भांडकर, ठाणे जिल्ह्याचे जिल्हा उपनिबंधक अविनाश भागवत यांच्या हस्ते करण्यात आले.

प्राचार्य अशोक दौंड, एकनाथ ढोले, ज्ञानेश्वर गायके, संतोष लोहाडे, तर पारितोषिक वितरणप्रसंगी माजी नगरसेवक बंडू बोरुडे, हुमायून आतार, बाबासाहेब गर्जे, राजेंद्र शेवाळे उपस्थित होते. गेल्या दहा वर्षांपासून मंडळाने ही स्पर्धा आयोजित करून यशस्वी पार पाडली. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी ओम डागा, सोनल जोजारे, मोनिष उदबत्ते, महेश पारखे, योगेश घोडके, गोपालसिंग शेखावत, ओंकार जोशी, दत्ता पंडित, डॉ. राहुल वेलदे, शाहरुख शेख, मोहन यादव, मुकुंद सुराणा, अमित चोपडे, अक्रम आतार, मनोज बिहाणी, अमोल कांकरिया, राहुल भगत आदींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक अजय भंडारी, सूत्रसंचालन अनिल खाटेर यांनी केले. आभार मुकुंद लोहिया यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...