आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअहमदनगर जिल्ह्यातील 179 परीक्षा केंद्रांवर उच्च माध्यमिक व माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेला गुरुवार (2 मार्च) पासून सुरुवात झाली आहे. शहरातील मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या रेसिडेन्सी हायस्कूल येथील केंद्रांवर परीक्षा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना गुलाबाचे फुल देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. परीक्षा कक्षा प्रवेश देण्यापूर्वी प्रत्येक केंद्रांवर परीक्षार्थींची झडती घेण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांबरोबरच पालकांची देखील परीक्षा केंद्राबाहेर गर्दी होती.
कॉपीमुक्त अभियान
राज्यात 2 ते 25 मार्च या कालावधीत दहावीची परीक्षा होणार आहे. दहावीच्या परीक्षेसाठी कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात कॉपी मुक्त अभियानासाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम साळीमठ यांच्या अध्यक्षतेखाली पथकांची नियुक्ती करण्यात आली असून, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, माध्यमिक शिक्षणाधिकारी, शिक्षण अधिकारी (योजना ),प्राथमिक शिक्षणाधिकारी व प्राचार्य यांचे 7 पथके नियुक्त करण्यात आली आहेत.
विद्यार्थ्यांना फुल देऊन शुभेच्छा
राज्यात यंदा इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी 69 हजार 534 विद्यार्थी पात्र आहेत. विविध केंद्रांबाहेर पाल्यांना शुभेच्छा देण्यासाठी पालकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी विद्यार्थ्यांना गुलाबाची फुले देऊन विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने पेपर द्या असे सांगण्यात आले. यावेळी दहावीच्या परीक्षार्थीं संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार नंदकुमार झावरे पाटील, उपाध्यक्ष रा.ह.दरे, प्राचार्य विजयकुमार पोकळे, आदी उपस्थित होते.
भरारी पथकांची नियुक्ती
दहावीच्या परीक्षेसाठी यंदा कॉपीमुक्त अभियानावर प्रशासनाने भर दिला आहे. कॉफी चे प्रकार होऊ नये यासाठी प्रथमच पोलीस, शिक्षण विभाग यांच्याबरोबरच महसूल विभाग देखील कॉपीमुक्त अभियानात आहे. त्यासाठी तालुकास्तरावर तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संवेदनशील केंद्र
अहमदनगर जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेसाठी 15 संवेदनशील केंद्र उभारण्यात आली आहेत. यामध्ये पाथर्डी तालुक्यात 6, शेवगाव 3, नगर शहर 3, जामखेड, नेवासे, कोपरगाव ,श्रीगोंदे प्रत्येकी 1 असे हे 15 संवेदनशील केंद्र आहेत. या सभेतील केंद्रावर परीक्षेदरम्यान कॉपीचा प्रकार होऊ नये यासाठी व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.