आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटीची भाडेवाढ पूर्वपदावर:आता पुण्याला जाण्यासाठी 195 नव्हे 175 लागेल भाडे; गर्दीचा हंगाम संपताच एसटीचे भाडे जैसै थै

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दिवाळीनिमित्त राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने दहा टक्के भाडेवाढ करण्यात आली होती. गर्दीचा हंगाम संपताच एसटीचे प्रवास भाडे पूर्वपदावर आले आहे. आता पुण्याला जाण्यासाठी 195 नव्हे तर 175 रुपये भाडे लागणार आहे. तर मुंबईचे भाडे देखील 450 रुपयावरून कमी होत 410 आकारले जाणार आहे.

अहमदनगर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने दिवाळी हंगामात तात्पुरती भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला होता. ही भाडेवाढ 20 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत करण्यात आली होती. प्रवाशांची या कालावधीत गैरसोय होऊ नये यासाठी एसटी महामंडळाने जादा बस गाड्यांचे नियोजन केले होते. दिवाळीपूर्वी साध्या व जलद गाडीसाठी प्रति टप्पा भाडे 8 रुपये 70 पैसे होते, तात्पुरत्या दरवाढीमध्ये प्रति टप्पा भाडे 9 रुपये 70 पैसे प्रति टप्पा करण्यात आले. त्यामुळे अहमदनगर येथून पुणे येथे जाण्यासाठी साध्या गाडीला 195 रुपये प्रवास भाडे तर मुंबईसाठी 450, कल्याण 350 तसेच औरंगाबाद 1851 रुपये भाडे आकारणी करण्यात आली.

गर्दीचा हंगाम संपल्यानंतर एक नोव्हेंबर पासून भाडे पूर्वपदावर आले आहे. त्यानुसार आता अहमदनगरहून पुण्याला जाण्यासाठी 175 रुपये तर मुंबईला जाण्यासाठी 410 रुपये भाडे आकारणी केली जाणार आहे. गर्दीच्या हंगामात एसटीने उद्दिष्ट पार कामगिरी केली आहे. दरवाढ कमी झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

प्रमुख ठिकाणी साध्या बसचे भाडे

पंढरपूर 290, सोलापूर 340, नाशिक 255, धुळे 330, पुणे 175, मुंबई 410, औरंगाबाद 175, कोल्हापूर 515, संगमनेर 150, दादर 400, शिर्डी 130.

निमआराम प्रवासभाडे

पंढरपूर 390, सोलापूर 465, नाशिक 345, धुळे 450, पुणे 240, मुंबई 560, औरंगाबाद 240, कोल्हापूर 700, संगमनेर 200, दादर 545, तर शिर्डी 180.

बातम्या आणखी आहेत...