आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार थोरात यांचे आवाहन:तालुक्याच्या सर्वांगीण विकासात भक्कम उभे राहा

संगमनेर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अडचणीतून मार्ग काढत मोठ्या कष्टातून संगमनेर तालुक्याने प्रगती साधली आहे. येथील सहकार व विकास हा राज्याला आदर्शवत ठरला आहे. सध्या संकटकाळ असला तरी प्रत्येकाने आपली जबाबदारी मनापासून पार पाडत तालुक्याच्या विकासाच्या पाठीमागे भक्कमपणे उभे रहा, असे प्रतिपादन काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथीगृहावर अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर आमदार डॉ. सुधीर तांबे ,ॲड. माधव कानवडे, माजी नगराध्यक्ष दुर्गा तांबे, रणजीतसिंह देशमुख, डॉ. जयश्री थोरात, राज्य सहकारी साखर संघाचे उपाध्यक्ष बाबा ओहोळ, आर. बी. राहणे आदी उपस्थित होते. आमदार थोरात म्हणाले, संगमनेर तालुका हा एक परिवार आहे. निळवंडेचे पाणी दुष्काळी भागाला देणे हे आपले जीवनाचे ध्येय आहे. अनंत अडचणीवर मात करून निळवंडे धरण आपण पूर्ण केले. बोगद्यांची कामे मार्गी लावली.आमदार डॉ. तांबे म्हणाले, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका सहकार पंढरी म्हणून ओळखला जात आहे. येथील प्रत्येक संस्थेने आपला वेगळा लौकिक निर्माण केला आहे. ही परंपरा नवीन पदाधिकारी नक्कीच पुढे नेणार आहेत.

याप्रसंगी मिलिंद कानवडे, सोमेश्वर दिवटे ,रामदास वाघ, रामहरी कातोरे, संपत डोंगरे, अभिजीत ढोले, रोहिदास पवार, सुभाष सांगळे, शांताराम कढणे, नवनाथ महाराज आंधळे, भारत मुंगसे, निर्मला गुंजाळ, बेबी थोरात, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक बाबा ओहोळ यांनी केले. उपाध्यक्ष संतोष हासे यांनी आभार मानले.

कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ यांची महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तर अमृतवाहिनी बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष सुधाकर जोशी व उपाध्यक्ष ॲड. नानासाहेब शिंदे, शेतकी संघाचे अध्यक्ष संपत डोंगरे, उपाध्यक्ष सुनील कडलग, हरिश्चंद्र फेडरेशनचे अध्यक्ष राजेंद्र गुंजाळ, महेश मोरे आदींचा सत्कार करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...