आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगरपरिषद हद्दीतील श्री छत्रपती संभाजी महाराज सर्कल ते गोकुळनगरी पूल रस्त्याचे काम तातडीने सुरु करून प्रशासकीय मान्यता मिळालेल्या विकास कामांच्या निविदा तातडीने प्रसिद्ध करा, अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाला दिल्या आहेत. शहराच्या रस्ते व विविध विकासकामांसाठी दिलेल्या निधीतून अनेक विकासकामांना प्रशासकीय मान्यता मिळाल्या आहेत. मात्र नगरपरिषदेने या कामांच्या निविदा प्रसिद्ध केलेल्या नाहीत.
तसेच श्री छत्रपती संभाजी महाराज सर्कल ते गोकुळनगरी पूल रस्त्याचे थांबलेले काम नागरिकांची डोकेदुखी वाढवत आहे. नगरपरिषद प्रशासनाकडून सातत्याने होत असलेला हलगर्जीपणा यापुढे खपवून घेतला जाणार नाही, अशी तंबी आमदार काळे यांनी दिली आहे. पाणी पुरवठा नियोजन, विकास कामांचे नियोजन व कोपरगाव शहरातील इतर विकास कामांकडे लक्ष देवून ती लवकर पूर्ण करा. ब्राम्हण समाज मंदिर, नाभिक समाज मंदिर, सुतार लोहार समाज मंदिर, गजानन नगर कब्रस्थान, नगरपरिषद हद्दीतील सर्व्हे नं. १०५ मधील नवीन कब्रस्थान कामांना प्रशासकीय मान्यता मिळाल्या आहेत.
नगरपरिषद प्रशासनाकडून या कामाच्या निविदा प्रसिद्ध केलेल्या नाहीत. या कामांच्या निविदा लवकरात लवकर प्रसिद्ध करा. सुरु असलेली विकास कामे दर्जेदार होतील याची गांभीर्याने काळजी घेवून नागरिकांच्या तक्रारी येणार नाही याची दक्षता घ्या. नागरिकांनी देखील आपापल्या प्रभागात सुरु असलेल्या विकासकामांची पाहणी करून हक्काने चांगल्या दर्जाची कामे करून घ्यावीत असे आवाहन आमदार काळे यांनी केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.