आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्टार्टअप यात्रेचे आयोजन:उद्यापासून स्टार्टअप नाविन्यता यात्रा

नगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील नावीन्यपूर्ण संकल्पना आणि नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत १५ ऑगस्ट ते २ सप्टेंबर, २०२२ पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्टार्टअप यात्रेचे आयोजन केले आहे. जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदे व कर्जत या तालुक्यांत ही यात्रा झाली आहे. उर्वरित ११ तालुक्यांत शनिवारपासून (२७ ऑगस्ट) ही यात्रा सुरू होणार आहे.

उत्तम संकल्पना सादर करणाऱ्या राज्यातील १३४ युवक-युवतींना रुपये १० हजारापासून ते १ लाखापर्यंतचे पारितोषिकेही दिली जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करून या यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त यांनी केले आहे.

जिल्हयातील युवकांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी जिल्ह्यांमध्ये स्टार्टअप व नावीन्यता यात्रेचे आयोजन २७ ऑगस्ट ते १ सप्टेंबर, २०२२ या कालावधीत तालुका स्तरावर करण्यात आले आहे. यामध्ये युवक-युवतींना प्रशिक्षण तसेच त्यांच्या संकल्पनांचे सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे. जिल्ह्यातील अकोले येथे २७ ऑगस्ट रोजी, जामखेड, संगमनेर, कोपरगाव, राहाता व राहुरी येथे २९ ऑगस्ट रोजी, पाथर्डी, श्रीरामपूर व नेवासा येथे ३० ऑगस्ट रोजी, अहमदनगर व शेवगाव येथे १ सप्टेंबर २०२२ रोजी ही यात्रा काढली जाणार आहे. विद्यार्थी व नवउद्योजकांनी या यात्रेत सहभाग नोंदवण्यासाठी www.msins.in किंवा www.mahastartupyatra.in या वेबसाईटवर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...