आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंदन शेतीच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार:राज्याचे कृषी आयुक्त धीरजकुमार यांचे आश्वासन; पिंपळनेरमध्ये चंदन शेतीला दिली भेट

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याचे कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथील शेतकरी राजेंद्र गाडेकर यांच्या चंदन शेतीला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी चंदन शेती संदर्भातील अडचणी सोडवण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री यांच्याशी चर्चा करू, अशी ग्वाही कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी यावेळी दिली.

राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या संकल्पनेतून ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या उपक्रमांतर्गत धीरजकुमार यांनी पिंपळनेर (ता. पारनेर) येथील चंदन उत्पादक शेतकरी राजेंद्र गाडेकर व शारदा राजेंद्र गाडेकर यांच्या 27 एकर चंदन शेतीला भेट देऊन पाहणी केली.

याप्रसंगी त्यांनी चंदन शेती कृषी पीक घोषित करण्यासंबंधी व चंदनशेती अनुदान तसेच पीक कर्ज संदर्भातील वनखात्याच्या अटी शर्तीविषयी चर्चा केली. त्यांनी गाडेकर यांच्याशी चंदन शेती संदर्भातील अडचणी व चंदन शेतीसाठी अनुदान याविषयी चर्चा केली. याप्रसंगी विभागीय कृषी सहसंचालक रफीक नाईकवाडी (पुणे), जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप, पारनेर तालुका कृषी अधिकारी विलास गायकवाड, तसेच पारनेर कृषी मंडळातील सर्व कृषी अधिकारी व शेतकरी बांधव उपस्थित होते. यावेळी राज्याचे कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी चंदन शेती व चंदन रोपवाटिका व चंदन प्रक्रिया चंदनापासून गंध बनवणाऱ्या मशीनची पाहणी केली.

चंदन शेती, प्रक्रिया उद्योगाचे कौतुक

शेतकऱ्याला करोडपती बनवणारे चंदन शेतीची मोठ्या प्रमाणात वाढ होईल. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री अब्दुल सत्तार या मंत्री यांचा एक दिवसीय बळीराजा उपक्रम स्तुत्य वाटला, असे राजेंद्र गाडेकर व शारदा राजेंद्र गाडेकर यांनी यावेळी सांगितले.

राजेंद्र गाडेकर यांनी आपल्या शेतात सत्तावीस एकर चंदनाची लागवड करून त्यामध्ये आंतरपीक म्हणून विविध फळझाडांची लागवड केलली आहे. त्यांच्या चंदन शेतीला पाहण्यासाठी दररोज अनेक शेतकरी भेट देतात. या शेतकऱ्यांना चंदनाच्या लागवडी संदर्भात गाडेकर मार्गदर्शन करतात.

बातम्या आणखी आहेत...