आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समावेश:राज्य बालनाट्य स्पर्धेस नगरच्या केंद्रावर प्रारंभ ; 19 बालनाट्य संघांचा समावेश

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने आयोजित १९ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेस नगर केंद्रावर मंगळवारी (३ जानेवारी) उत्साहात प्रारंभ झाला. या स्पर्धेत सहभागी झालेल्या १९ संघांच्या बालनाट्यांचा ५ जानेवारीपर्यंत नाट्य रसिकांना आनंद घेता येणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ रंगकर्मी व नाट्य परीक्षक उदय वैद्य यांच्या हस्ते झाले.

यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाचे सदस्य सतीश शिंगटे, नाट्य परिषदेच्या महानगर शाखेचे अध्यक्ष संजय लोळगे, परीक्षक शंकर घोरपडे, डॉ. गणेश शिंदे, मंजूषा जोशी, समन्वयक सागर मेहेत्रे व जालिंदर शिंदे आदींसह शहरातील रंगकर्मी व बालकलाकार उपस्थित होते. स्पर्धेच्या प्रारंभी नाट्य आराधना प्रस्तुत ‘एक रात्र गडावर हे बालनाट्य सादर झाले.

उदय वैद्य म्हणाले, की बालरंगभूमीने अनेक दिग्गज सिने-नाट्य कलावंत दिले आहेत. सतीश शिंगटे म्हणाले, की शासनाने बालनाट्य स्पर्धांच्या आयोजनात सातत्य ठेवल्याने बालकलाकारांना प्रोत्साहन मिळत असून, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. स्पर्धेचे समन्वयक सागर मेहेत्रे यांनी प्रास्ताविक केले. सहसमन्वयक जालिंदर शिंदे यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...