आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्य सामायिक प्रवेश परीक्षेसाठी अहमदनगर जिल्ह्यात आठ केंद्र बुधवारी निश्चित करण्यात आले असून, या आठ केंद्रावर 5 ते 11 ऑगस्ट दरम्यान पीसीएम तर 12 ते 20 ऑगस्ट दरम्यान पीसीबी ग्रुपसाठी परीक्षा होणार आहेत. पीसीएमसाठी 14 हजार 261 तर पीसीबीसाठी 19 हजार 122 उमेदवार परीक्षा देणार आहेत. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी दिली.
मुंबई राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष आयुक्त यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी अहमदनगर जिल्हा केंद्रावर 5 ते 11 ऑगस्ट (9 ऑगस्ट वगळता) या कालावधीमध्ये पीसीएम ग्रुप व 12 ते 20 ऑगस्ट 2022 (15, 16, 19 ऑगस्ट वगळून) या कालावधीमध्ये पीसीबी ग्रुपसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परिक्षा सकाळी 7.30 ते दुपारी 12 वाजेपर्यंत (प्रथम सत्र) व दुपारी 12.30 ते सायंकाळी 6.45 पर्यंत (द्वितीय सत्र) या वेळेत 9 केंद्रांवर घेण्यात येणार आहे.
16 अधिकाऱ्यांची नियुक्ती
परीक्षेसाठी वर्ग-2 च्या एकूण 16 अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या परीक्षेचे केंद्रप्रमुख म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित हे काम पाहणार आहेत. परीक्षेस बसलेल्या उमेदवारांना सकाळ सत्रासाठी सकाळी 7:30 ते 8:30 वाजेपर्यंत प्रवेश मिळेल. तर दुपारच्या सत्राकरीता दुपारी 12:30 ते 1:30 वाजेपर्यंत प्रवेश देण्यात येणार आहे.
दोन ग्रुपचे उमेदवार
या परीक्षेसाठी अहमदनगर जिल्हा केंद्रावर पीसीएम ग्रुपकरीता 14 हजार 261 व पीसीबी ग्रुपकरीता 19 हजार 122 उमेदवार परीक्षेस बसलेले आहेत. अहमदनगर जिल्हयातील पीसीएम ग्रुप करीता 8 व पीसीबी ग्रुप करीता 8 परीक्षा केंद्रावर उमेदवारांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षेस बसलेल्या उमेदवारांना सकाळ सत्रासाठी सकाळी 7:30 ते 8:30 वाजेपर्यंत प्रवेश मिळेल तर, दुपारच्या सत्राकरीता 12:30 ते 1:30 वाजेपर्यंत प्रवेश देण्यात येणार आहे.
परिक्षेसाठी जिल्हा संपर्क अधिकारी
परीक्षेकरीता परीक्षा आयुक्त, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यामार्फत जिल्ह्यासाठी जिल्हा संपर्क अधिकारी म्हणून डी. बी. करंजुले, अधिव्याख्याता, शासकीय तंत्रनिकेतन (मो.क्र.8975551555) आणि पी. एन. पोरात, अधिव्याख्याता शासकीय तंत्रनिकेतन (मो.क्र.9922170777) यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.