आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कार प्रदान:जामखेड पत्रकार संघाला राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

जामखेड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय काम तसेच नेहमीच समाजकार्यात अग्रेसर असलेल्या जामखेड पत्रकार संघाच्या कामाची पावती म्हणून नाशिक विभागात जामखेड पत्रकार संघास आदर्श पत्रकार संघाचा पुरस्कार गंगाखेड येथे झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. गंगाखेड येथे राज्यस्तरीय पत्रकार मेळावा आयोजित करण्यात आला होता.

मेळाव्याचे स्वागताध्यक्ष म्हणून आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार विलास बडे तर अध्यक्ष म्हणून आखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष एस. एम देशमुख हे होते. यावेळी जामखेड पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष नासीर पठाण, उपाध्यक्ष अशोक निमोणकर, सचिव मिठुलाल नवलाखा, सहसचिव अविनाश बोधले, खजिनदार सुदाम वराट, जिल्हा प्रतिनिधी यासीन शेख, ज्येष्ठ पत्रकार सुनील कोठारी, समीर शेख, किरण शिंदे, अजय अवसरे, नंदुसिंग परदेशी, जाकीर शेख, रियाज शेख, असिफ सय्यद पत्रकार उपस्थित होते. बडे यांनी आजच्या पत्रकारितेची दिशा व दशा तसेच ग्रामीण पत्रकारांसमोरील आव्हाने याविषयी सविस्तर विवेचन केले. एस. एम. देशमुख म्हणाले, पत्रकार संरक्षण कायदा झाला, पण आंमलबजावणी नाही हे दुर्दैव आहे. पत्रकारांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यासाठी कोणालाही वेळ नाही. फक्त प्रसिद्धी हवी आहे.

बातम्या आणखी आहेत...