आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिवेशन:हमाल-मापाडी महामंडळाचे‎ नगरमध्ये राज्यस्तरीय अधिवेशन‎

नगर‎23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य हमाल-मापाडी महामंडळाचे‎ राज्यस्तरीय अधिवेशन १६ एप्रिल‎ रोजी नगरमध्ये आयोजित करण्याचे‎ ठरवले आहे. या अधिवेशनाचे‎ उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ‎ नेते खासदार शरदचंद्र पवार यांच्या‎ हस्ते होणार आहे. याबाबत पुणे येथे‎ हमाल-मापाडी महामंडळाच्या‎ पदाधिकाऱ्यांनी खासदार पवार‎ यांची भेट घेऊन निमंत्रण दिले.‎ यावेळी राज्याचे पदाधिकारी डॉ.‎ बाबा आढाव, उपाध्यक्ष राजकुमार‎ घायाळ (बीड), सरचिटणीस‎ सुभाष लोमटे (औरंगाबाद),‎ सहचिटणीस अविनाश घुले, हनुमंत‎ बहिरट (पुणे), संतोष नांगरे,‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ संघटक गोरख मेघडे, खजिनदार‎ हुसेन पठाण, बाबा आरगडे आदि‎ उपस्थित होते. खासदार पवार‎ म्हणाले, नगरमध्ये मला स्व.‎ शंकरराव घुले यांनी मला शेवटपर्यंत‎ साथ दिली.

हमाल-मापाडींच्या‎ प्रश्नांसाठी स्व. घुले यांनी विशेष‎ पुढाकार घेत प्रश्न सोडवले. प्रलंबित‎ प्रश्नांसाठी हमाल-मापाडी यांच्या‎ पाठीशी आपण उभे राहू.‎ सुमारे २१ वर्षांपूर्वी तत्कालीन‎ नगराध्यक्ष स्व. शंकरराव घुले‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ यांच्या नेतृत्वाखाली राज्य‎ अधिवेशन झाले होते. कोरोना‎ साथीमुळे बराच काळ अधिवेशन‎ घेता आले नाही; दीर्घ मुदतीनंतर हे‎ अधिवेशन होत असल्याने विशेष‎ महत्व आहे. कायदा होऊन बरेच‎ दिवस झाल्याने शासनालाही स्थैर्य‎ नसल्याने माथाडी कामगारांचे‎ अनेक नवीन प्रश्न निर्माण झाले‎ आहेत. मुठभर लोकांनी या‎ कायद्याला मोडीत काढण्याचे प्रयत्न‎ करत आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...