आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:दुर्गा तांबे यांना राज्यस्तरीय जिजाऊ गौरव पुरस्कार प्रदान

संगमनेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महिला बचतगटांच्या माध्यमातून महिला सबलीकरण, समाजकारण, शिक्षण व पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल जयहिंद महिला मंचच्या अध्यक्षा दुर्गा तांबे यांना महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेड तर्फे राज्यस्तरीय जिजाऊ गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

धुळे येथे महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेड तर्फे झालेल्या पहिल्या राज्यस्तरीय ग्रामीण अधिवेशनात तांबे यांना या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. सुनंदा पवार, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष माधुरी भदाणे, अर्जुन तनपुरे, ॲड. ललिता पाटील यावेळी उपस्थित होते.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्गा तांबे यांनी जयहिंद महिला मंचच्या माध्यमातून गावागावात महिलांचे संघटन करत महिला सबलीकरणाची मोठी चळवळ उभी केली आहे. महिलांसाठी आरोग्य शिबिरे, चर्चासत्रे, मार्गदर्शन, सहलींचे आयोजन. जयहिंद युवा मंचच्या माध्यमातून युवकांना प्रोत्साहन देत निरोगी व निकोप समाज निर्मितीचे काम ते करत आहे. संगमनेर शहरात पायाभूत विकासाच्या अनेक योजना राबवल्या आहेत. स्वच्छतेसाठी विविध उपक्रम हाती घेतले आहे. गोरगरीब व अपंगासाठी त्यांचे योगदान आहे.

बातम्या आणखी आहेत...