आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिडा स्पर्धा:विखे पाटील पॉलिटेक्निकच्या खेळाडूंची राज्य पातळीवर निवड

लोणी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील पॉलिटेक्निकच्या मुलींनी राज्य पातळीवरील विभागीय बास्केटबॉल स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. अँथेलेटिक्स स्पर्धेतही उत्तम कामगिरी केल्याची माहिती प्राचार्य डॉ. विजय राठी यांनी दिली. कोपरगाव येथील संजिवनी पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या प्रांगणात या विभागीय पातळीवरील क्रिडा स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. बास्केटबॉल उपांत्य सामन्यात संजीवनी पॉलीटेक्निक संघाला ६-३ च्या फरकाने पराभूत करून राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये विखे पॉलिटेक्निकचा संघाची निवड निश्चित झाली आहे.

अक्षदा कडू हिने नऊ बास्केट केल्या तर कर्णधार सिद्धी जंगले हिने तीन बास्केट करून संघाला विजय मिळवून दिला. अथलेटिक्स मध्ये सुषमा केकान हिने १०० मीटर धावणे या स्पर्धेत द्वितीय स्थान प्राप्त करून राज्य स्पर्धेमध्ये आपले स्थान पक्के केले. शॉट पुट मध्ये वृषाली पुंगळ हिने तृतीय क्रमांक पटकावीला तर कर्णधार दिपाली तांबे हिने व्हॉलीबॉल मध्ये अतिशय उत्कृष्ट सर्विसचे प्रदर्शन केले. सिद्धी जंगले हिने लांब उडीमध्ये उत्कृष्ट खेळ केला. खेळाडूंना क्रिडा संचालक डॉ. श्रीनिवास मोतीयेळे, हरिष हजारे, अविनाश अनाप यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे यांनी अभिनंदन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...