आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऊस परिषद:श्रीरामपुरात राज्यस्तरीय ऊस परिषदेचे आयोजन, शेतकरी फुंकणार विविध प्रश्नांवर रणशिंग

श्रीरामपूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येत्या १६ एप्रिलला उसासह शेतीच्या व शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत श्रीरामपुरात राज्यस्तरीय शेतकरी ऊस परिषद आयोजित करण्यात आली आहे. यासाठी राज्यभरातून अनेक तज्ञ उपस्थित राहणार असल्याची माहिती अॅड. अजित काळे यांनी दिली.

ऊस परिषदेच्या आयोजनाबाबत नुकतीच शेतकरी संघटनेच्या कार्यालयात बैठक झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, संपर्क प्रमुख शिवाजी जवरे, युवा आघाडी प्रमुख बच्चू मोढवे, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष युवराज जगताप, नेवासे तालुका अध्यक्ष हरिभाऊ तुवर, भास्कर तुवर, संदीप उघडे, विलास कदम, बाळासाहेब शिरसाठ, गोविंदराव वाघ, सुदामराव औताडे, अॅड. सर्जेराव घोडे, विष्णुपंत खंडागळे, किशोर पाटील, छावाचे नितीन पटारे, कैलास पवार, संजय वमने, शरद पवार, बबन उघडे, प्रभाशंकर तुवर, मनोहर मटकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. राज्यासह जिल्ह्यात अतिरिक्त उसाच्या अनुषंगाने ऊस परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. १६ एप्रिलला लक्ष्मी त्रिंबक मंगल कार्यालय, श्रीरामपूर येथे दुपारी १ वाजता ही परिषद होणार आहे. दोन साखर कारखान्यांमध्ये २५ कि. मी. हवाई अंतर आहे. मात्र, राज्यात ऊसाचे विक्रमी उत्पादन झाले असून सर्व उसाचे गाळप होणार नाही. त्यामुळे ही अट रद्द करून १५ कि. मी. हवाई अंतर करण्यात यावे, तसेच ऊस गाळप शक्य नसेल, तर तो ऊस इथेनॉल निर्मिती करणाऱ्या कारखान्यांना देता यावा, ऊस जास्त झाल्याने ऊस तोड नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. त्यामुळे उसाचे वजन घटून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तर अनेक शेतकऱ्यांचा ऊस तुटलाच जाणार नाही. त्यामुळे उशिरा तुटलेल्या उसाला एकरी २५ हजार रुपये व गाळपाअभावी शिल्लक राहिलेल्या उसाला एकरी एक लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी, आदी मागण्यांबाबत परिषदेमध्ये विचार होणार असल्याची माहिती अॅड. काळे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...