आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुस्ती हगामा:जामखेड शहरात उद्या राज्यस्तरीय कुस्ती हगामा

जामखेड12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागेश्वराच्या पावन भूमीत कै.विष्णू उस्ताद काशीद उर्फ बाबा यांच्या स्मरणार्थ भव्य जंगी निकाली कुस्त्यांचे मैदान गेल्या १९ वर्षापासून जामखेड शहरांत होत आले आहे.यावर्षी बुधवारी (३ ऑगस्ट) राज्यस्तरीय कुस्ती हगामा दुपारी २ ते ७ या वेळेत होणार आहे. हा हगामा मराठी शाळेच्या बाजुच्या मैदानात होणार आहे, अशी माहिती कै. विष्णू (उस्ताद) काशीद प्रतिष्ठानचे मुख्य संयोजक तथा भाजपाचे तालुकाध्यक्ष अजय काशीद यांनी दिली.

या निकाली कुस्त्यांच्या मैदानासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रा. राम शिंदे हे असतील. तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार डॉ. सुजय विखे, आमदार सुरेश धस, आमदार रोहित पवार,आमदार बाळासाहेब आजबे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, इंदोर मध्य प्रदेश येथील भाजपचे नेते अशोक खंडेलवाल, हिंद केसरी .रोहितजी पटेल, ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा सुवर्णपदक तथा अर्जुन पुरस्कार विजेता राहुल आवारे हे उपस्थित राहणार आहेत. यावर्षीच्या कुस्ती मैदानाचे वैशिष्ट्य म्हणजे या वेळेची अंतिम कुस्ती महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख व उपमहाराष्ट्र केसरी अक्षय शिंदे यांच्यात होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...