आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची माजी आमदार नजरधने यांच्या निवासस्थानी भेट

महागावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उमरखेड विधानसभा मतदार संघात दौऱ्यावर असताना माजी आमदार राजेंद्र नजरधने यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत आमदार मदन येरावार, आमदार अशोक उईके, आमदार संजीव रेड्डी बोदकुलवार उपस्थित होते. त्यांचा जंगी सत्कार यावेळी करण्यात आला.

प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर आले होते. उमरखेड येथे कार्यक्रमानिमित्त जात असताना उमरखेड विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार राजेंद्र नजरधने यांच्या निवासस्थानी त्यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी उपस्थित कार्यकर्ते यांच्याशी प्रदेशाध्यक्ष यांनी संवाद साधला. तसेच विधानसभा मतदार संघातील उपस्थित कार्यकर्ते यांच्याकडून आढावा घेतला. माजी आमदार राजेंद्र यांनी शेतकऱ्यांवर कोसळलेल्या अस्मानी संकट आणि त्यातून झालेले शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या व्यथा त्यांनी मांडल्या. ग्रामीण रुग्णालयाची भव्य अशी कोरी इमारत उभी असताना रिक्त पदा अभावी उद््घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. क्रीडा संकुल काम पूर्णत्वास नेण्यात यावे. नगरपंचायत क्षेत्रासाठी २० कोटींचा भरीव निधी उपलब्ध करून द्यावा व तालुक्यातील ग्रामपंचायत यांच्या विकासासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी माजी आमदार राजेंद्र नजरधने यांनी प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे केली आहे.

भेटीदरम्यान रंगली राजकीय चर्चा
बावनकुळे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर माजी आमदार राजेंद्र नजरधने यांच्या सोबत झालेल्या पहिल्या भेटीमध्ये विधानसभा मतदार संघातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडीविषयी चर्चा झाली असल्याचे सूत्रांकडून समजते. त्यामुळे आगामी निवडणुकीत मतदारसंघात काही फेरबदल होण्याचे संकेत आहेत. तर जाता जाता प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी माजी आमदार राजेंद्र नजरधने यांना विधानसभा मतदार संघात सक्रिय राहण्याच्या सूचना केल्याने कार्यकर्ते उत्साही झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...