आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिकाऱ्यांवर जबाबदारी:लव्ह जिहाद-धर्मांतराचे प्रकार घडल्यास ‘पीआय’चे निलंबन, राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखेंचे निर्देश

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

“लव्ह जिहाद’, धर्मांतराचे प्रकार झाल्यास त्या त्या भागातील पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांना जबाबदार धरून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देश राज्याचे महसूलमंत्री, तथा नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी शुक्रवारी (७ एप्रिल) दिले.

अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. विखे म्हणाले, “लव्ह जिहाद’, धर्मांतराचे प्रकार वाढत आहेत. आपले पोलिस काय करतात? गुन्हेगारांना कायद्याचे राज्य काय असते, ते दाखवून द्यावे.”

खालच्या स्तराचा पोलिस कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना हवालदारावर कारवाईचा अधिकार नाही. अधिकाऱ्यांना बांधून ठेवू नका. पोलिसांनी वाढलेल्या गुन्हेगारीवर मोकळेपणाने काम करावे. गुन्हेगारीचे प्रमुख कारण असलेले वाळूमाफिया वाळूच्या नवीन धोरणामुळे संपणार आहेत.