आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानियमित अभ्यास आणि रोज पहाटे दोन तास व संध्याकाळी चार तास अवांतर वाचन, तसेच शोशल मिडियावर स्पर्धा परिक्षा संदर्भातील व्हिडिओचा सकारात्मक पद्धतीने मदत घेत सुप्रिया भाऊसाहेब सजगुरे यांनी राज्यकर निरीक्षकपदाचे स्वप्न साकार केले. ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबात राज्य लोकसेवा आयोगाच्या राज्यकर निरिक्षकपद मिळवले.
याबद्दल महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी त्यांच्या नुकताच सत्कार केला. पाथरे बु. गावातील विद्यार्थी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उर्तीण होत आहेत, विद्यार्थ्यांमध्ये परिवर्तन होत आहेत, असे ते म्हणाले.
राहाता तालुक्यातील पाथरे बुद्रुक येथील शेतकरी कुटुंबात वाढलेली सुप्रिया सजगुरे यांनी परिस्थितीवर मात करून राज्य सेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवल्याने परिसरात कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी हायस्कुलमध्ये झाले. बी. ई. इलेक्ट्रॉनिकमधून तिने इंजिनिअरिंग पदवी संपादन केली.
सुप्रिया भाऊसाहेब सजगुरे यांनी यापूर्वी तीनवेळा परिक्षेत अपयश येऊनही खचून न जाता आत्मविश्वास, जिद्द व मेहनतीच्या जोरावर तिने यश मिळवले. यात आई वडिलांनी सतत साथ दिली म्हणून या पदापर्यंत पोहोचू शकले, भविष्यात केंद्रीय लोकसेवा आयोगाची परिक्षा देवून उच्च पदावर जाण्याचा मानस सुप्रिया सजगुरे यांनी व्यक्त केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.