आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धार्मिक:पानसनाला सुशोभीकरण प्रकल्प नेवासे परिसराचे वैभव वाढवणारा, देवगड येथील श्रीदत्त देवस्थानचे महंत भास्करगिरी महाराज यांचे प्रतिपादन

सोनई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेला पानसनाला सुशोभीकरण प्रकल्प परिसराचे वैभव वाढवणारा आहे, असे प्रतिपादन महंत भास्करगिरी महाराज यांनी केले. शनीशिंगणापूर देवस्थान ट्रस्टच्या प्रकल्पाची भास्करगिरी महाराज यांनी पहाणी केली. यावेळी ते बोलत होते.

जगभरात प्रसिद्ध असलेले शनी महाराज यांचे मंदिर असलेले घरांना दारे नसलेल्या श्रीक्षेत्र शनीशिंगणापूर येथील शनी शिंगणापूर देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून मंदिर परिसरातून वाहत असलेल्या पानसनाला नदीचे मंत्री शंकरराव गडाख यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली पानसनाला नदीपात्र सुशोभिकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. या भव्यदिव्य कामांची पाहणी नुकतीच महंत भास्करगिरी महाराज श्रीक्षेत्र देवगड यांनी देवस्थानच्या वतीने आयोजित सप्ताहभेटी प्रसंगी केली. मंत्री गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या कामाचे भास्करगिरी महाराजांनी कौतूक केले. प्रकल्पात उभारण्यात आलेल्या नवग्रह दीपस्तंभामुळे शनीशिंगणापूर परिसराच्या अध्यात्मिक वैभवात भर पडली. शनी शिंगणापूर हे मोठे पवित्र धार्मिक स्थळ असून या परिसराचा योग्य नियोजनाखाली विकास सुरू आहे, असेही महंत भास्करगिरी महाराज म्हणाले. प्रकल्पाअंतर्गत सुरू असलेल्या घाट बांधणी, नदीपात्र परिसर सजावट, बारमाही स्वच्छ पाणी वाहाते राहावे, यासाठी केलेली स्वतंत्र व्यवस्था, विविध शिल्प व सर्व प्रकल्पाची माहिती शनी शिंगणापूर देवस्थान ट्रस्टचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी दिली. याप्रसंगी शनीशिंगणापूर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भागवत बानकर, विश्वस्त, कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ दरंदले, बाळू महाराज कानडे आदी उपस्थित होते.

शनीशिंगणापूर देवस्थान ट्रस्टच्या प्रकल्पाची केली पाहणी

भाविकांना पर्यटनाचा आनंद मिळेल
पानसनाला सुशोभिकरण प्रकल्पामुळे शनिशिंगणापूर येथील आध्यत्मिक दर्शनाबरोबरच भाविकांना नदीकिनारी असलेल्या निसर्ग सौंदर्याच्या पर्यटनाचा आस्वाद घेता येईल. शनी शिंगणापूर येथे दर्शनासाठी आलेल्या भाविकांना प्रसन्न वाटावे, यासाठी मंत्री शंकरराव गडाख यांच्या संकल्पनेतून या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...