आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत नॅशनल असोसिएशन ऑफ पोस्टल एम्प्लॉईजच्या शिष्टमंडळाने आमदार संग्राम जगताप यांना साकडे घातले.
देशव्यापी संपाच्या दुसऱ्या दिवशी नॅशनल असोसिएशन ऑफ पोस्टल एम्प्लॉईज अहमदनगरच्या वतीने आमदार जगताप यांना संपातील मागण्यांचे निवेदन देण्यात आले. केंद्रीय संघटनेच्या आवाहनानुसार दोन दिवसीय संप अहमदनगर विभागात दुसऱ्या दिवशीही यशस्वी करण्यात आला. मंगळवारी संघटनेचे नेते संतोष यादव व प्रदीप सूर्यवंशी यांनी आमदार संग्राम जगताप यांची भेट घेत मागण्यांविषयी चर्चा केली. मागणीपत्रातील महत्त्वाचा व कामगारांविषयी जिव्हाळ्याचा विषय जुनी पेन्शन सर्वांसाठी लागू करावी, सरकारच्या कामगार विरोधी धोरणाविषयी चर्चा केली व याविषयी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी चर्चा करण्याची विनंती आमदार जगताप यांना यादव यांनी केली. जुनी पेन्शनबाबत निश्चित सकारात्मक प्रयत्न केले जातील, असे आश्वासन आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी दिले. याप्रसंगी संघटनेचे नेते संदीप कोकाटे, कमलेश मिरगणे, प्रदीप सूर्यवंशी, अनिल धनावत आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.