आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खळबळ:दुकानासमोर पार्किंग केलेल्या वाहनाची चाके नेली चोरून

राहुरी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहुरीतील फळ व्यापाऱ्याच्या दुकानासमोर पार्किंग केलेल्या पिकअप टेम्पोचे टायर व डिक्स हे २२ हजार रूपये किंमतीचे दोन चाक अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याने खळबळ उडाली आहे. तनपुरेवाडी रोडलगत धाडगे इस्टेटमध्ये शुक्रवारी राञी चोरीची ही घटना घडली. राञी सव्वादहा वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरटे पिकअपमध्ये घटनास्थळी आले. साई फ्रुट या दुकानासमोर पार्किंग केलेल्या एम.एच.१७ बी.वाय ४३३६ या पिकअपच्या मागील बाजुस दगडाचा आधार देऊन दोन चाक बाजुला काढण्यात आले. अंधाराचा फायदा घेऊन चोरट्यांनी हे काम केले. नंतर चोरटे शहरातील नवीपेठमार्गे नगर मनमाड मार्गाने पसार झाले. चोरीसाठी वापर करलेल्या पिकअप वाहनाला नंबर प्लेटला काळसर रंग लावला होता. शनिवारी सकाळी व्यापारी इस्माईल सय्यद दुकानवर आले असता पिकअपचे दोन्ही चाक गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सय्यद यांनी राहुरी पोलिसात धाव घेऊन या घटनेची फिर्याद दिली. या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...