आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वक्तव्य:लक्ष्मीनगर रहिवाशांना उतारे देण्यासाठी पावले उचला : आमदार आशुतोष काळे

कोपरगाव13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोपरगाव शहरात शासकीय जागेवर अनेक नागरिक वर्षानुवर्षापासून राहत आहे. त्याचप्रमाणे शहराच्या लक्ष्मीनगर परिसरातही अनेक नागरिक शासकीय जागेवर वास्तव्य करीत असून या नागरिकांना तातडीने त्यांच्या नावे उतारे देण्यासाठी तातडीने पावले उचला, अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी नगर रचना विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

शहरातील लक्ष्मी नगरमध्ये शासकीय जागेवर वास्तव्य करीत असलेल्या नागरिकांच्या घरांची अामदार काळे व नगर रचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी केली. यावेळी नग्गर रचना विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत ते म्हणाले, कोपरगाव शहरात शासकीय जागेवर अनेक नागरिक वर्षानुवर्षापासून राहत आहे. शहराच्या लक्ष्मीनगर परिसरातही बऱ्याच नागरिकांचे शासकीय जागेवर वास्तव्य आहे. या नागरिकांनी शासकीय जागेवर बांधलेली अतिक्रमणे नियमाकुल करण्यासाठी नगररचना, मूल्यनिर्धारण विभागाचे संचालक सुधाकर नांगनोरे यांची भेट घेवून त्यांना या जागा नियमानुकूल करण्याबाबत चर्चा झाली. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी कमिटीची बैठक घेऊन लक्ष्मीनगर मधील शासकीय जागेवर राहणाऱ्या नागरीकांना त्यांच्या जागा शासकीय नियमाप्रमाणे नियमित करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करून हे प्रस्ताव शासनाकडे पाठविले आहेत. कोपरगाव नगरपरिषदेच्या माध्यमातून सर्व्हे करून, अतिक्रमित जागेची माहिती घेवून हे प्रस्ताव शासनाकडे दाखल केले आहे.

शासन निर्णयानुसार रस्ता, खुली जागा व सुविधा भूखंडासाठी लागणाऱ्या जागेसाठी प्रस्तावित आराखड्यानुसार विकास नियंत्रण नियमावली मधील अटी शिथिल करण्याबाबत जिल्हाधिकारी यांचे मार्फत कार्यवाहीसाठी पाठविण्यात आलेल्या प्रस्तावाची दखल घेवून या प्रस्तावास मंजुरी मिळावी व लक्ष्मीनगर भागात शासकीय जागेवर राहत असलेल्या नागरिकांची अतिक्रमणे नियमानुकूल करणेबाबत जिल्हाधिकाऱ्यांना देखील भेटलो आहे. लवकरच या प्रस्तावास मंजुरी मिळणार आहे. यावेळी मुख्याधिकारी शांताराम गोसावी, नगररचना विभागाचे अधिकारी संजय बारगळ, नगरपरिषद अभियंता हर्षवर्धन सुराळकर, निलेश मिरीकर, विशाल वऱ्हे, दिपक बडगुजर, माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, माधवी वाकचौरे, राजेंद्र वाकचौरे, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...