आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Ahmednagar
  • Stinking Water Coming To The Tap In Shevgaon, Endangering The Health Of The Citizens; Municipal Negligence, Statement Given To The Administration | Marathi News

पालिकेचे दुर्लक्ष:शेवगावमध्ये नळाला येतेय दुर्गंधीयुक्त पाणी, नागरिकांचे आरोग्य धोक्यात; नगर पालिकेचे दुर्लक्ष, प्रशासनाला दिले निवेदन

शेवगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर परिषदपेक्षा आपली ग्रामपंचायत बरी असं म्हणण्याची वेळ सध्या शेवगावकरावर आली. गेल्या महिन्यापासून शहराला पिवळसर पाण्याचा पुरवठा होत आहे. मात्र, नगर परिषद प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सर्वसामान्य शेवगावकरांचे आरोग्य धोक्यात आले. जोपर्यंत स्वच्छ व निर्जंतुक पाणी पिण्यासाठी उपलब्ध होत नाही तसेच ठेकेदारावर कारवाई करून स्वच्छ पाणी पुरवठा जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत नगरपरिषदेची घरपट्टी, पाणीपट्टी न भरण्याचे आवाहन निवेदनाद्वारे सामाजिक कार्यकर्ते डॉ. निरज लांडे यांनी केले.

गेल्या महिनाभरापासून शेवगाव शहरांमध्ये घाण दुर्गंधीयुक्त पिवळसर असे पाणी पिण्यासाठी येते. तेही बारा दिवसाच्या कालावधीनंतर तेही अस्वच्छ असे. त्याचा वापर धुणी-भांडी करण्यासाठी सुद्धा अयोग्य असून तेच पाणी नाईलाजास्तव नागरिकांना पिण्यासाठी वापरावे लागत आहे. पाण्यामुळे शहरातील नागरिकांना गॅस्ट्रो, जुलाब, उलट्या, ताप अश्या साथींच्या आजाराचा सामना करावा लागत आहे. कुठल्याही पद्धतीने या पाण्याचे शुद्धीकरण न करता नागरिकांना पाजले जात असून पाण्याचे कोणतेही निर्जंतुकीकरण केले जात नाही. त्यामध्ये वापरले जाणारे क्लोरीन, टीसीएल हे केमिकल तसे पाहिले तर पाणी शुद्धीकरणासाठी वापरली जाते. मात्र त्याचा वापर न केल्याने अतिशय दुर्गंधीयुक्त पिवळसर पाणी ठेकेदाराकडून पुरवले जात आहे.

परंतु नगर परिषद प्रशासन कुठलीही कारवाई करत नाही. ठेकेदाराकडून यावर उपाययोजना होताना दिसत नाही. पाण्याचा रंग पाहता असे लक्षात येते की, यामध्ये कुठले तरी केमिकल किंवा मळी मिसळली जात आहे. दर वर्षी उन्हाळ्यात अशा प्रकारचा त्रास शेवगावकरांना जाणीवपूर्वक सहन करावा लागतो. नगरपालिका प्रशासन याच्यावर कुठल्याही उपाययोजना राबवत नसून उलट हात वर करते. नगरपालिका प्रशासनाने ठेकेदाराला समज दिली नाही तर आठ दिवसाच्या आत स्वच्छ पाणी मिळाले नाही. तर नगर परिषद कार्यालयात मुख्याधिकारी दालनात ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनात दिला गेला आहे. या निवेदनावर डॉ. निरज लांडे, अभिजित आव्हाड, अमोल माने आदींच्या सह्या आहेत. निवेदनाच्या प्रती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगर विकास विभागाचे सचिव तसेच जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना पाठवण्यात आल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...