आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉम्बची चोरी:नगरमध्ये जिवंत बॉम्ब चोरून शेतात पुरला; दोघांना अटक, तीन महिन्यांनंतर उघडकीस आली बॉम्ब चोरी झाल्याची घटना

नगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खारेकर्जुने येथील लष्कराच्या के. के. रेंज हद्दीतून मिसफायर झालेल्या बॉम्बची चोरी झाल्याची घटना तीन महिन्यांनंतर उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दोघांना अटक केली असून, त्यांना ६ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

लष्करातील कर्मचारी बंडू उत्तम येणारे (३८, नेमणूक के. के. रेंज) यांनी फिर्याद दिली. अमित संतोष गोंधळे व जयराम चौधरी (दोघे रा. ढवळपुरी, ता. पारनेर) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांनी भंगार समजून बॉम्ब चोरल्याचे सांगण्यात आले.

अमित गोंधळे व जयराम चौधरी यांनी के. के. रेंज हद्दीत बेकायदेशीरपणे प्रवेश करून बाॅम्ब चोरला व घराजवळील शेतात पुरून ठेवला होता. ३१ मार्च रोजी ही बाब उघडकीस आली. पारनेर पोलिसांना याची माहिती मिळताच पारनेर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी घटनास्थळी धाव घेतली. लष्करी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पाेलिस व लष्कराचे बॉम्बशोधक पथकही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बॉम्बची पाहणी केली असता हा बॉम्ब जिवंत असल्याचे समोर आले. पोलिसांनी हा परिसर तत्काळ रिकामा केला. लष्कराच्या बॉम्बशोधक पथकाने त्या ठिकाणीच तो बॉम्ब नष्ट केला.

बातम्या आणखी आहेत...