आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसचे आंदोलन:ईडीच्या माध्यमातून होत असलेली गांधी परिवाराची बदनामी थांबवा ; श्रीरामपुरात काँग्रेसचे आंदोलन

श्रीरामपूर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर केंद्र सरकारने ईडीच्या मदतीने बदनामी करण्याचे काम सुरू केले आहे. देशासाठी समर्पित असणाऱ्या गांधी परिवारावर सूडबुद्धीने केलेली ईडीची कारवाई आणि देशात मोदी सरकारच्या सुरु असलेल्या हुकूमशाही विरोधात माजी उपनगराध्यक्ष व जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांचे मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर काँग्रेस व श्रीरामपूर तालुका काँग्रेसच्या वतीने श्रीरामपूर प्रांताधिकारी कार्यालय समोर केंद्र सरकार विरोधात अांदाेलन करण्यात अाले. याप्रसंगी सचिन गुजर, संजय छल्लारे, संजय फंड, बाबासाहेब दिघे, शशांक रासकर, आशिष धनवटे, राजेंद्र आदिक, सुभाष तोरणे, राजेंद्र पाऊलबुद्धे, सुधीर नवले, निलेश भालेराव ,रावसाहेब आल्हाट, सरबजीत सिंग चुग, वैभव पंडित, मिथुन शेळके, रितेश एडके, जाफर शहा, सुरेश दुबे, राहुल बागूल, संजय साळवे, दीपक कदम, अशोक जगधने, संजय गोसावी, मंगल सिंग साळुंके, सुनील साबळे, सनी मंडलिक, गोपाल भोसले, लक्ष्मण शिंदे, अजय धाकतोडे, कृष्णा पुंड, राजेश जोंधळे, विशाल साळवे, गणेश काते, भैया भाई अख्तार उपस्थित होते.

ईडी कारवाई विरोधात काँग्रेसच्या कानडे गटाचे धरणे आंदोलन देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देश उभारणीमध्ये अत्यंत मोलाचे योगदान देणाऱ्या गांधी कुटुंबाला सूडबुद्धीने जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे.या विरोधात काँग्रेसच्या वतीने आमदार लहू कानडे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालय येथे निदर्शने, धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी इंद्रनाथ थोरात,अंकुश कानडे, ज्ञानेश्वर मुरकुटे,अंजुम शेख, अशोक कानडे, राजेश अलघ, रवींद्र गुलाटी, मुक्तार शहा, कलीम कुरेशी, विजय शेळके, अॅड.समीन बागवान, अभिजीत लिप्टे, कार्लस साठे, अमृत धुमाळ, वेणुनाथ कोतकर ,रमेश उंडे, अशोक बागुल, रज्जाक पठाण, रफिक शेख, सरपंच किशोर बनकर, सागर मुठे, राजेंद्र कोकणे, सुरेश पवार, आबा पवार, राजेंद्र औताडे, रमेश आव्हाड, प्रमोद उंडे, योगेश आसने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...