आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण:आमदार थोरातांची नफरत छोडो; भारत जोडो घोषणा घराघरात

संगमनेर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेगाव येथे झालेल्या सभेत ‘नफरत छोडो, भारत जोडो’ या घोषणेने आपल्या भाषणाची सुरुवात करणारे भारत जोडो अभियानाचे समन्वयक विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे राज्यभरातून यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. समाजातील विविध घटकांचा सहभाग मिळाला.‌ लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी व एकतेचा आणि प्रेमाचा संदेश देण्यासाठी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर काढलेल्या यात्रेला महाराष्ट्रात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

आमदार बाळासाहेब थोरात यांच्याकडे राज्यातील भारत जोडो यात्रेच्या नियोजनाची जबाबदारी होती. त्यांनी दोन महिन्यापासून यात्रेच्या पूर्वतयारीचे नियोजन केले होते. महाराष्ट्रातून ३८२ किमीच्या प्रवासात विविध ठिकाणचे रस्ते, मुक्कामाची तयारी, विश्रांती, जेवण व सभेचे नियोजन, सहभागी होणाऱ्या विविध संघटना, निमंत्रण, कार्यकर्ते, पदाधिकारी व सहभागी होणाऱ्या सर्वांची व्यवस्था, सुरक्षा, वैद्यकीय व्यवस्था सर्व नेत्यांची समन्वय पदाधिकाऱ्यांशी चर्चा अशी मोठी जबाबदारी आमदार थोरात यांनी यशस्वीपणे पार पाडली.

१७ दिवसात नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, बुलढाणा या पाच जिल्ह्यातून ३८२ किलोमीटरचा प्रवास यात्रेने केला. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्यात तर आमदार थोरात यांच्या नेतृत्वाखाली शेगाव येथे सभा झाली. भारत जोडो यात्रेला पाच वाजता ध्वजवंदनानंतर सुरुवात होत. सकाळच्या सत्रात १४ किलोमीटरच्या प्रवासानंतर दुपारी विश्रांती व त्यानंतर बुद्धिवादी, विचारवंत, लेखक, आदिवासी, शेतकरी, सामान्य नागरिक यांच्याशी संवाद होत होता. विश्रांतीनंतर पुन्हा ही यात्रा सुरू होऊन १२ किलोमीटरचा प्रवास करत. रात्री मुक्कामाच्या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांची आरोग्य तपासणी केली जात होती.

६ डॉक्टरांचे पथक आणि दोन रुग्णवाहिका यासाठी सज्ज होत्या. यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, कम्युनिस्ट पक्ष, मेघा पाटकर, समाजवादी पक्ष, पुरोगामी विचारांच्या विविध संघटना, शेतकरी, आदिवासी संघटना यांनी सहभाग घेतला. यात्रा आता मध्यप्रदेश मध्ये दाखल झाली आहे. आमदार बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या काटेकोर नियोजनाचे देशभरात कौतुक होत आहे.

बातम्या आणखी आहेत...