आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैधरित्या गौण खनिजाचे उत्खनन थांबवा:प्रशासनाने आवश्यक उपाययोजना अमलात आणाव्यात; राधाकृष्ण विखे यांचे निर्देश

अहमदनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर जिल्ह्यात खानपट्ट्यांमधून अवैधरित्या गौण खनिजाचे उत्खनन होणार नाही यासाठी प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना अमलात आणाव्यात. असे निर्देश महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी ( रविवार 4 डिसेंबर) ला देतानाच विकास कामासाठी आवश्यक असलेल्या खनिजासाठी महसूल विभागाकडून अधिकृत परवानगी घेण्याचे आवाहन केले.

यांची होती उपस्थिती

अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या, तक्रारी विखे यांनी जाणून घेतल्या त्यावेळी ते बोलत होते.आमदार बबनराव पाचपुते,जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील, परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, दक्षिण भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे आदी यावेळी उपस्थित होते.

काय म्हणाले विखे?

विखे म्हणाले,पशुधनातील लंम्पी त्वचा आजार, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई, पीकविमा, अन्नधान्य वितरण, वीज वितरण आदी विषयांचा उपस्थित अधिकाऱ्यांकडून सविस्तर आढावाही घेतला.

जिल्ह्यातील सर्वसामान्य व्यक्तींची प्रत्यक्ष भेट घेत त्यांची निवेदने स्वीकारत त्यांच्या असलेल्या अडी-अडचणी, असलेले प्रश्न ऐकून घेत त्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी जिल्हाभरातून नागरिक, विविध शिष्टमंडळ, विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...