आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौण खनिज:‘गोविंद सागरमधून होणारी अवैध गौण खनिजाची वाहतूक थांबवा’

टाकळीभान9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथे सुरू असलेल्या अवैध गौण खनिज व मुरुम वाहतूक थांबवण्यात यावी, असे साकडे टाकळीभान ग्रामस्थांनी तहसीलदारांना घातले. माजी मंत्री स्व. खासदार गोविंदराव आदिक यांच्या संकल्पनेतून टाकळीभान येथे साकारण्यात आलेल्या गोविंद सागर ( टेल टँक) हा १९७२ मध्ये दुष्काळात लोकांना काम मिळावे म्हणून उभारणी केली होती. आज या गोविंद सागरवर आज बारा गावची पिण्याच्या पाण्याची पाणी पुरवठा योजना अवलंबून आहे. व टाकळीभान व इतर आठ ते नऊ गावे सुजलाम सुफलाम झाले आहे. मात्र या टेलटँकमधून मुरुम माफियांनी अवैध गौण खनिजाची वाहतूक सुरू केली आहे. याची माहिती संबधित अधिकाऱ्यांना देऊनही काहीही कार्यवाही होत नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी एकत्र येवून थेट तहसीलदारांनाच निवेदन देऊन हे थांबण्यासाठी साकडे घातले.

अवैध गौण खनिजाची वाहतूक करणारे गोविंद सागर तलावाच्या भिंतीवरुन जड वाहनांद्वारे वाहतूक करतात. त्यामुळे तलावाची भिंत कमकुवत होत आहे. बेसुमार मुरुम उत्खनाने टँक मध्ये मोठ मोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे त्याठिकाणी अनेक दुर्दैवी घटना घडल्या आहेत. याकडे दुर्लक्ष कल्याने अनेक तरुणांना या मुरुम माफियांमुळे जीव गमवावा लागला आहे.

राॅयल्टीच्या नावाखाली बेसुमार व त्याच्या चार पट मुरुम उचला जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर सुंदर रणनवरे, माजी ग्राम पंचायत सदस्य आप्पासाहेब रणनवरे, मायकल रणनवरे, शंकर रणनवरे, संदीप रणनवरे, विकास पाटेकर, राजेंद्र तडके, दत्तात्रय लाड, गणेश भवार, विजय आहेर, गोविंद साबळे, दीपक गुंड, सोमनाथ वेताळ, भानुदास पारे, दत्तू बोरगे, जॉन रणनवरे, सतीश रणनवरे, संदीप शिनगारे, प्रणव अमोलीक, दीपक भुसारी, सोमनाथ सदाफळ, दिगंबर रणनवरे, आप्पासाहेब बनकर, ज्ञानेश्वर सपकळ, निखील गायकवाड, शंकर लाड आदी ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...