आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

50 ते 60 हजार रुपयांचे बिले देउन वसुली:महावितरण विरोधात निघोजला रास्ता रोको

पारनेर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरगुती ग्राहकांना महावितरणने ५० ते ६० हजार रुपयांचे बिले देउन वसुली करीत वीज तोडत ग्राहकांवर अन्याय केल्याच्या निषेधार्थ निघोज एसटी बस स्थानक परिसरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.हे आंदोलन निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत कवाद,सोशल मिडीयाचे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जितेश सरडे, उपसरपंच माऊली वरखडे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी करण्यात आले.

गेली दोन ते तीन महिन्यांत रिडींग घेणारे लोक बदलल्याने नवीन लोकांनी आहे ते रिडिंग दाखवून बिलात मोठी तफावत आढळली.ज्या विज ग्राहकाचे बिल महिनाकाठी पाचशे ते सहाशे रुपये येत असते त्यांना हेच बिल हजारांच्या पुढे आले. काहींचे मिटर दोष दाखवून हेच बिल पन्नास हजारांच्या आसपास आले. जितेश सरडे यांच्याकडे बहुतांश विज ग्राहकांनी तक्रारी केल्या होत्या. सरडे यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून याबाबत चर्चा केली. मात्र अधिकारी आहे त्या बिलावर ठाम राहिले. तर बिल भरले नसल्याचे कारण दाखवून विज कर्मचाऱ्यांनी वीज तोडण्याची मोहीम हाती घेतली होती.

आंदोलनस्थळी दोन तासांनी उपकार्यकारी अभियंता आडभाई यांनी लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. ३ रुपये ६३ पैसे दराने सरसकट वीज‌आकारणी करीत निघोज येथील कार्यालयात बिल तपासणीसाठी स्वतंत्र कक्ष सुरू करुन अन्याय दूर करण्यात येईल, असे लेखी आश्वासन उपकार्यकारी अभियंता प्रशांत आडभाई यांनी दिल्यानंतर रस्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...