आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:केडगाव-नेप्ती रोडचे काम सुरु न झाल्यास रास्ता रोको

नगर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केडगाव ते नेप्ती रोडचे काम तातडीने चालू करण्यात यावे अन्यथा केडगाव शिवसेनेच्यावतीने १ डिसेंबर रोजी नगर-पुणे रोडवर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा केडगाव शिवसेना विभागप्रमुख संग्राम कोतकर यांनी दिला आहे. त्यांनी कोतवाली पोलिसांनाही निवेदनाची प्रत दिली आहे. यावेळी नगरसेवक अमोल येवले, विजय पठारे, बबलू शिंदे, नगरसेविका सुनिता कोतकर आदी उपस्थित होते.

केडगाव-नेप्ती रोड भागात अनेक उपनगरे आहेत. तेथील नागरिकांना येण्या-जाण्याचा नेप्ती रोड हा एकमेव मार्ग आहे. या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अनेकांना मणक्याचे आजार जडले आहेत.

या रस्त्याबाबत ३१ ऑक्टोबर रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र दिले होते. त्यांनी १० दिवसात काम करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, २१ दिवस उलटले तरी अद्याप काम चालू झाले नाही. त्यामुळे केडगाव भागातील नगरसेवक व शिवसेनेच्यावतीने नागरिकांसह नगर-पुणे रोडवर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...