आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:विधवा प्रथा बंद करा: ग्रामीण विकास केंद्र संस्थेची मागणी

श्रीगोंदे16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधवा महिलेला कोणत्याही धार्मिक, सामाजिक कार्यक्रमात सहभागी हाेऊ िदले जात नाही. कायद्याने प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार आहे. या अधिकारावर या प्रथेमुळे गदा येत असल्याने ही विधवा प्रथा बंद करण्यात यावी. यासाठी ग्रामपंचायतीने तसा ग्रामसभेमध्ये ठराव घ्यावा, अशी मागणी गुरुवारी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी मनोज रंगनाथ दिनकर यांच्याकडे करण्यात आली.

श्रीगोंदे तालुक्यातील २७ गावांत विशेष करून एकल महिलांचे प्रश्न, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, बाल संगोपन योजना, विविध कल्याणकारी योजना, संविधान जनजागृती, अनाथ निराधार मुलांचे शिक्षण, शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या ओघात आणणे, कौटुंबिक हिंसाचार, भटके-विमुक्त, आदिवासी समाजाच्या विकासासाठी संस्थेच्या माध्यमातून काम चालते. या कामासाठी लोणी व्यंकनाथ आणि कर्जत तालुक्यात भटके-विमुक्त संसाधन केंद्र, कौटुंबिक हिंसाचार कायदेविषयक सल्ला केंद्र सुरु केले आहे.

महिलेच्या पतीच्या निधनानंतर तिचे कुंकू पुसणे, मंगळसूत्र तोडणे, पायातील जोडावी काढणे, या सारख्या प्रथांचे आजही पालन केले जाते. त्यामुळे ही प्रथा बंद करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी तालुका समन्वयक संतोष भोसले, छाया भोसले, जालिंदर शिंदे, लता शिंदे, उज्ज्वला मदने, सुनीता बनकर, अनिल चव्हाण उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...