आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या विचारांचा पगडा असलेल्या एकनाथ सोनाजी खरात यांनी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यात आपली नोकरी सांभाळत असताना विविध सामाजिक शैक्षणिक चळवळीत भाग घेऊन समाज हितासाठी काम केले. त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यासाठी प्रा. डॉ. धर्माजी खरात यांनी ‘बाप नावाचं वादळ’ हा काव्यसंग्रह प्रकाशित केला. ‘बाप नावाचं वादळ’ ही बाप सांभाळण्याची एक सामाजिक चळवळच त्यांनी उभी केली. निश्चितच नवीन पिढीला हे ‘बाप नावाचं वादळ’ प्रेरणादायी ठरेल असे प्रतिपादन भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी केले.
कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथे राज्यस्तरीय महाकवी संमेलनात त्या बोलत होत्या. बाप नावाचं वादळ काव्यसंग्रहाचे प्रकाशन माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. राज्यस्तरीय बाप नावाचे वादळ महाकवी संमेलन झाले. अध्यक्षस्थानी प्रवरा ग्रामीण मेडिकल सायन्सेसचे कुलगुरू डॉ. व्ही. एन. मगरे होते.
याप्रसंगी म्हाडाचे अध्यक्ष शिवाजी ढवळे, जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, माजी नगराध्यक्ष ऐश्वर्या सातभाई, संजय सातभाई, डॉ. गोरक्षनाथ रोकडे, सिने अभिनेते चंद्रकांत शिंदे, काळे कारखान्याचे संचालक आनंदराव चव्हाण, राज्य कर उपयुक्त दिलीप झाल्टे, सरपंच संजय गुरसळ, डॉ. सुभाष रणधीर, कल्याण होन, प्रभाकर होन, भाऊसाहेब होन, संध्या गायकवाड, पंडित भारुड, संगीता सोनवणे, रंजित खरात, उज्ज्वला कांबळे, संजय खरात, बाळासाहेब देवकर, ज्ञानेश्वर शिंदे, अरुण खरात आदींसह महाराष्ट्रभरातून आलेले कवी, लेखक, ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रारंभी प्रास्ताविकात प्रा. डॉ. धर्माजी खरात यांनी ‘बाप नावाचं वादळ’ या कवितासंग्रहाचा उद्देश विशद केला. बाप सांभाळण्याची सामाजिक चळवळ सुरू केली असून आयुष्यभर कष्ट करणारा बाप शेवटच्या क्षणी वृद्धाश्रमात टाकण्याचे पाप त्यांची मुले करतात. संस्कृती व सामाजिक बांधिलकी टिकण्यासाठी ज्या आई-बापांनी आपल्याला घडवले. त्याच आई-बापावर वृद्धाश्रम जाण्याच वेळ येऊ नये म्हणून या पुस्तकातून प्रबोधन केले. वृद्ध त्या माता-पित्यांचा आधार ही सामाजिक चळवळ बनेल, असे त्यांनी सांगितले. कुलगुरू व्ही. एन. मगरे, राजेश परजणे, म्हाडाचे अध्यक्ष शिवाजी ढवळे, माजी नगराध्यक्ष ऐश्वर्या सातभाई, सिने अभिनेते चंद्रकांत शिंदे, डॉ. गोरक्षनाथ रोकडे यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन संध्या गायकवाड व पंडित भारूड यांनी केले. सर्व उपस्थितांचे आभार रणजित खरात यांनी मानले.
कविंचा ट्रॉफी देऊन सन्मान
कविसंमेलनात शंभरहून अधिक कवी, कवयित्री यांनी सहभाग घेतला होता. स्व. एकनाथ सोनाजी खरात यांच्या पुतळ्याचे अनावरण व त्यांच्या स्मरणार्थ स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते वृक्षांचे रोपण चांदेकसारे येथे करण्यात आले. या कविसंमेलनात सहभागी झालेल्या कवी लेखक यांना ट्रॉफी प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.