आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नदीला पूर:कुकाणे,भेंडे परिसरात दमदार पावसाने ओढे, नाले,नदीला पूर

कुकाणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुकाणे व भेंडेसह परिसरात गुरुवारी रात्रीपासून शुक्रवार सकाळपर्यंत झालेल्या दमदार पावसाने ओढ्यानाल्यांना पूर आला. कुकाणे दहिगावने मार्गावरील देवढे वस्तीजवळ नदीला पुर आल्याने गुरुवारी रात्रीपासून ते शुक्रवारी सकाळी ११ वाजेपर्यंत या मार्गावरील वाहतूक बंद होती. काही वाहने या पुरामुळे तरवडी मार्गे कुकाणे व दहिगावनेकडे वळवण्यात आली.

चिलेखनवाडी ते वडुले व देवसडे ते चिलेखनवाडी मार्गावरही अेाढ्यांना पूर आला होता. कुकाणे, भेंडे परिसरातील हा यावर्षीचा पहिलाच दमदार पाऊस आहे. नद्या, विहिरी काठोकाठ भरल्याने शेतकऱ्यांचा आनंद द्विगुणित झाला. कुकाण्यात गुरुवारी रात्री ५५ मिमी पावसाची नोंद झाली. कुकाण्यासह भेंडे खुर्द व बुद्रूक, तरवडी, वडुले, अंतरवाली, सुकळी, शिकारी नांदूर, देवगाव, देडगाव, देवसडे, पाथरवाले, तेलकुडगाव, गेवराई, चिलेखनवाडी, वाकडी, शिरसगाव, फत्तेपूर, शहापूर, पिंप्रीशहाली, सौंदाळे, भानसहिवरे, शिवारात दमदार पावसाने विहिरींची पाणीपातळी काठांवर आली.

कुकाणे ते घोडेगाव मार्गावरील कौठा ओढ्यालाही सकाळी पूर होता. भेंडे खुर्द व भेंडे बुद्रूक मधील नदीलाही रात्रीच्या पावसाने पूर आला. त्यामुळे भेंडे-सलाबतपूर मार्गावरही वाहतूक खोळंबली होती. वाड्यावस्त्यांवरचे लहानमोठे नालेही खळखळ वाहते झाले. कुकाणे, भेंडे व सोनई परिसरात रात्री ४५ मिमी पाऊस झाला. तर नेवासे मंडळात १०२ मिमी झाला. नेवासे तालुक्यात आजपर्यंत झालेला पाऊस मिलिमिटरमध्ये -कुकाणे व भेंडे- ८८०, नेवासे -८१७, सोनई -८०६, वडाळा-८८२ शिरसगाव-९३७, माका-४६२, खडा-६२३, दहिगावने-८२१, सलाबतपूर- ७६०.

नुकसानग्रस्त पिकांचे सरसकट पंचनामे करण्याची मागणी
कौठा
गेल्या काही दिवसांपासून तालुक्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस होत आहे. या पावसामुळे खरीप हंगाम २०२१-२२ मधील पिकाचे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास नैसर्गिक आपत्ती मुळे वाया गेला आहे. आमदार शंकरराव गडाख यांनी कृषी व महसूल विभागाला सरसकट पंचनामे करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.

नेवासे तालुक्यातील चांदा महसूल सर्कलमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे. अति आणि सततच्या पावसामुळे खरीप हंगाम वाया जाणार असल्याचे चित्र आहे. काही शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेत सहभाग घेतला आहे. मात्र असंख्य शेतकरी आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे या योजनेत सहभागी झाले नाही. त्या शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहेे.

तत्कालीन ठाकरे सरकारने सन २०१९२०-२०२१ मध्ये असेच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे बांधावर जाऊन पंचनामे करण्याचे आदेश कृषी व महसूल विभागाला दिले होते. त्यानुसार शेतकऱ्यांचे पंचनामे झाले. पण बाधित शेतकऱ्यांना तत्कालीन सरकारने नुकसान भरपाई मिळाली नाही. यामुळे असंख्य शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेत सहभाग घेतला नाही. अशा शेतकऱ्यांना कोण वाली आहे. अशी विचारणा करत पावसामुळे शेतकऱ्यांचे झाले असून सरसकट पंचनामे करावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जाते. दरम्यान, गुरुवारी झालेल्या पावसामुळे घोडेगाव ते कुकाणे, कौठा ते रस्तापूर चांदा ते रस्तापूर रस्ते काही काळ पुरामुळे बंद झाले होते.

बातम्या आणखी आहेत...