आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेवगाव येथील दोन युवकांनी महापुरुषांबद्दल सोशल मीडियावर वादग्रस्त व्हिडीओ टाकल्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी सर्व स्तरातून बंदची हाक देण्यात आली होती. सोमवारी शेवगाव शहर आणि तालुक्यातील बहुतांश गावांत, व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेऊन घटनेचा निषेध नोंदवला. या घटनेचा निषेध नोंदण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे सकाळी नऊच्या सुमारास नागरिक एकत्र जमण्यास सुरुवात झाली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापासून पायी चालत जात छत्रपती शिवाजी महाराज चौकात दाखल झाले.
सर्व युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची सामूहिक आरती करण्यात आली. शेवगाव शहर बंद करण्यासाठी तालुक्यातील विविध पक्ष, सामाजिक कार्यकर्ते, सर्व मराठा संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी यावेळी सहभागी झाले. यावेळी संतप्त युवकांनी घटनेच्या निषेधार्थ घोषणाबाजी करीत औरंगजेबाच्या प्रतिमा जाळून निषेध नोंदवला. दहिगावने, देवटाकळी, भातकुडगावफाटा, घोटण, खानापूर, चापडगाव, बोधेगाव, बालमटाकळी, अमरापूर आदी गावांत बंद पाळण्यात आला. काही गावात, दहावीच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांची गरज ओळखून दुपारनंतर दुकाने उघडण्यात आली. अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके, उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील हे परिस्थीतीवर लक्ष ठेवून शहरात तळ ठोकून होते. पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.