आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअहमदनगर, पुणे, सोलापूर, बीड, बारामती जिल्ह्यात जबरी चोरी, मोटारसायकल चोरी करणारा अट्टल गुन्हेगार श्रीगोंदे पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत. श्रीगोंदे पोलिसांनी सुमारे ३ लाख ३० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
२८ फेब्रुवारी रोजी सुमण वामन रायकर, रा. हंगेवाडी यांनी फिर्याद दिली होती. यात २६ फेब्रुवारी रोजी २०२२ रोजी अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरी जाण्यासाठी गाडीची वाट पाहत असताना यातील आरोपीने मला ओळखता, मी तुम्हाला तुमचे घरी सोडतो असे म्हणून फिर्यादीस मोटार सायकलवर बळजबरीने बसवून निमगाव खलु गावच्या शिवारात नेवून मारहाण करून सोन्या, चांदीचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल असा ४२ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. त्याबाबत श्रीगोंदे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास चालू असताना पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांना मिळालेल्या माहितीवरून यातील सराईत गुन्हेगार प्रकाश अजिनाथ गायकवाड, वय ४६ वर्षे रा. बेनवडी, ता. कर्जत याने केल्याची माहिती मिळाली. त्यावरुन यातील आरोपीस बेनवडी येथून ताब्यत घेतले. चौकशीत त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. चोरलेल्या मालापैकी आठ ग्रॅमचे सोन्याचे ३० हजारांचे दागिने काढून दिले. त्याच्याकडील मोटार सायकलची चौकशी केली असता सदर मोटार सायकल ही शिवाजीनगर पोलिस स्टेशन, बीड येथून चोरुन आणल्याचे त्याने सांगितले. चौकशीत त्याच्याकडून पाच मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.
यांनी केली कारवाई
चोरीचे गुन्हे उघड़कीस आणून चोरीस गेलेल्या मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. आरोपी प्रकाश अजिनाथ गायकवाड याच्यावर तब्बल ३१ गुन्हे दाखल आहेत. आरोपी पोलिस कोठडीत असून त्यांचेकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अमित माळी, पोलिस कॉन्स्टेबल वैभव गांगर्डे करीत आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामराव ढिकले, पोसई अमित माळी, अंकुश ढवळे, गोकुळ इंगवले, प्रकाश मांडगे, किरण बोराडे, दादासाहेब टाके, अमोल कोतकर, वैभव गांगडे, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे यांच्या पथकाने केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.