आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर:आचारसं‍हितेची काटेकोर अंमलबजावणी करा

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक पदवीधर विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. आचारसंहिता लागू झाली आहे. या आचारसंहितेचे काटेकोर पालन होईल, या दृष्टीने नियोजन करत निवडणूक विषयक कामे वेळेत व जबाबदारीने पार पाडावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिले.

निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक पार पडली. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. बैठकीस अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील आदींसह सर्व उपजिल्हाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी भोसले म्हणाले की, विधान परिषद पदवीधर मतदारसंघासाठी जिल्ह्यात एकूण १४७ मतदान केंद्र आहेत या मतदान केंद्रावर मतदारांसाठी सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. निवडणूक प्रक्रीया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांना सोपविलेली कामे जबाबदारीने पार पाडावीत.

बातम्या आणखी आहेत...