आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मान्सून पूर्व पाऊस:पारनेर तालुक्यात मान्सून पूर्व पावसाचे दमदार आगमन ; वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी नुकसान

पारनेर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारनेर शहरासह तालुक्यातील बहुतांश गावांत बुधवारी रात्री मृग नक्षत्रातील मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. रोहिणी नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकरी हवालदिल झाले होते.बुधवारी रात्री तालुक्यात सर्वदूर झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. अद्याप समाधानकारक पाऊस झाला नसला तरी खरीप हंगामातील पिकांबाबत शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. दरम्यान, वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडून जाणे, झाडे उन्मळून पडणे आदी घटना घडल्या आहेत. गुरूवारी दिवसभर झालेल्या नुकसानींचे पंचनामे गावोगावी सुरू होते. यावर्षी पावसाला दमदार सुरूवात झाल्याने आता खरीप हंगामाच्या मशागतीला सुरुवात होणार आहे. तालुक्यात खरीप हंगामात परंपरेने घेण्यात येणार्‍या मूग,बाजरी, कडधान्ये या पिकांबरोबरच गेल्या सुमारे वीस वर्षांपासून विशेषतः पठार भागात वाटाण्याची मोठ्या प्रमाणावर पेरणी केली जाते.गेल्या काही वर्षांपासून तालुक्यात सोयाबीन,मोठे वाल (राजमा) ही पिकेही घेण्यात येत आहेत.खरीप हंगामातील पिकांसाठी रोहीणी व मृग नक्षत्रातील मान्सूनपूर्व पाऊस उपयुक्त ठरतो हा तालुक्यातील शेतकऱ्यांचा अनुभव आहे.

बातम्या आणखी आहेत...