आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पभूधारक शेतकरी:परिस्थितीवर जिद्दीने मात करत महेश झाला उपनिरीक्षक

शेवगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील भातकुडगाव येथील अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील महेश आबासाहेब फटांगरे यांची राज्यसेवा परीक्षेत यश मिळवून त्यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली. याबद्दल राजीव राजळे मित्र मंडळाच्या वतीने नगरसेवक महेश फलके यांच्या कार्यालयात कृषक समाजाचे राज्याध्यक्ष,ज्येष्ठ नेते बापूसाहेब भोसले यांच्या हस्ते फटांगरे यांना सन्मानित करण्यात आले आहे .

या प्रसंगी राजीव राजळे मित्र मंडळाचे राहुल धस, किरण आहेर,पत्रकार प्रा. जनार्दन लांडे उपस्थित होते. नगरसेवक महेश फलके म्हणाले, जीवनात यश मिळवणाऱ्या व्यक्तिच्या पाठीवर थाप टाकून परिस्थितीवर मात करत त्याने प्राप्त केलेल्या यशाचे कौतूक झाले पाहिजे. आबासाहेब फटांगरे यांची परिस्थिती जेमतेम असल्याने महेश यांना मामाकडे राहून प्राथमिक शिक्षण घ्यावे लागले.

भातकुडगावला अकरावी बारावी केल्यानंतर पुढे त्यांनी वडिलांना शेतीकामात मदत करत शेवगावच्या न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयातून बी.ए. केले. आई-वडिलांना आर्थिक सहकार्याची गरज होती. म्हणून महेश सन २०१७ मध्ये राज्य राखीव पोलिस दलात भरती झाले. २०२१ मध्ये त्यांचा विवाह झाला. जबाबदारी आणखी वाढली. मात्र जिद्द होती, त्यासाठी प्रयत्न केले. कामाचा व्याप सांभाळत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. पहिल्याच प्रयत्नात यशही मिळाले. आई,वडिलांच्या आशीर्वादाने घेतलेल्या परिश्रमाचे चीज झाल्याची भावना महेश फटांगरे यांनी सत्कारला उत्तर देताना व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...