आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्दैवी घटना:प्रवरा नदीत बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू; पाण्याचा व खड्ड्याचा अंदाज न आल्याने घटना

संगमनेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मित्रांसोबत प्रवरा नदीला पोहण्यास गेलेल्या संकेत वाडेकर (वय १९, साकूर मांडवे) या महाविद्यालयीन युवकाचा बुडून मृत्यू झाला. तो संगमनेर महाविद्यालयात प्रथम वर्षात शिकत होता. ही दुर्दैवी घटना मंगळवारी सायंकाळी गंगामाई घाटावर घडली. संकेत मित्रांसमवेत नदीपात्रात पोहण्यासाठी उतरला होता.

पाण्याचा व खड्ड्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक मुकुंद पवार घटनास्थळी दाखल झाले. जलपटूंनी त्याला सापडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो खड्ड्यातील गाळात अडकला होता. तासभराच्या प्रयत्नानंतर संकेतचा मृतदेह बाहेर काढण्यात येऊन शवविच्छेदनासाठी पालिकेच्या कुटीर रुग्णालयात नेण्यात आला. नागरिकांनी यावेळी मोठी गर्दी केली होती. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. उकाड्यामुळे प्रवरा नदीवर पोहणाऱ्यांची गर्दी वाढली आहे. वाळू तस्करीमुळे प्रवरा पात्रात मोठे खड्डे पडल्याने पाणी व खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने या घटना घडतात. नदी पात्रात पोहण्यास उतरताना नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

बातम्या आणखी आहेत...