आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारहाण:श्रीगोंदे बसस्थानक परिसरात एसटी वाहकाची विद्यार्थ्यांना मारहाण

श्रीगोंदे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीगोंदे बस स्थानक परिसरात एसटी वाहकाकडून विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याची घटना घडल्या नंतर पालकांनी आंदोलन केल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. संबंधित वाहकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी पालकांकडून करण्यात आली. जामखेड वरून सुटणारी पुण्याला जाणारी एसटी श्रीगोंदयातून जाते. त्यावेळी वाहकाकडून भावडी येथील विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याची घटना घडली. मात्र वाहक त्यांना श्रीगोंदयात सोडून पुण्याकडे गेले असता पालकांनी आक्रोश करत आगाराचे गेट बंद आंदोलन केले. त्यावेळी बराच वेळ एसटी वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक समीर अभंग हे दाखल झाल्यानंतर मध्यस्थीने प्रकरण मिटवत संबंधित वाहकावर गुन्हा दाखल करण्याचे सर्वानुमते ठरले. मात्र वाहतूक उपनिरीक्षक आहेर यांनी नागरिकांशी अरेरावीची भाषा वापरल्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. आहेर यांनी नागरिकांना गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. व भावडी बस चालू करण्याची मागणी करण्यात आली. श्रीगोंदे आगाराचे काही कर्मचारी आणि विद्यार्थी तसेच अनेक पालक श्रीगोंदे पोलिस स्टेशनला पोहचले मात्र तक्रार आगारातील कर्मचारी देणार का ? पालक तक्रार देणार यांच्यात ताळमेळ झाला नाही. परिणामी कोणीही श्रीगोंदे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली नाही.

वाहतूक उपनिरीक्षक यांच्याबाबत ऑनलाइन तक्रारी ? श्रीगोंदे आगाराचे वाहतूक उपनिरीक्षक हे सर्व सामान्य नागरिकांशी कायम अरेरावी ची भाषा वापरतात तसेच खोटे बोलून नागरिकांची दिशाभूल करतात त्यामुळे त्यांच्या विरोधात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर अनेक तक्रारी दाखल केल्या असल्याची माहिती नागरिकांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...