आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंत गाडगेमहाराज छात्रालयातील विद्यार्थ्यांनी संत गाडगेमहाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता करून अभिवादन केले. स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी विद्यार्थ्यांनी हातात झाडू घेऊन जनजागृतीसाठी फेरी काढली.यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहाजवळील आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाच्या संत गाडगेमहाराज छात्रालयातील विद्यार्थ्यांनी मंगळवारी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेचा उपक्रम राबवला. गाडगेमहाराजांनी दिलेला सार्वजनिक स्वच्छतेचा मूलमंत्र आचरणात आणून विद्यार्थी झाडू घेऊन रस्त्यावर उतरले.
गाडगेमहाराजांच्या वेशभुषेतील एका विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी सहकार सभागृहापासून स्वच्छता फेरी काढली. स्वच्छतेबाबत काढलेली ही जागृती फेरी नगरकरांसाठी लक्षवेधी ठरली. स्वच्छता फेरी आटोपल्यानंतर छात्रालयाच्या आवारात पुण्यतिथीचा कार्यक्रम झाला.
अध्यक्षस्थानी सिताराम काकडे, विशाल पांडे, संस्थेतील विकास गवळी, मुख्याध्यापक जगन्नाथ बोडखे, बाबासाहेब लोंढे, मनीषा कोळगे, अधीक्षक बाबासाहेब पातकळ, सतीश काळे, संजय सकट, संभाजी आठरे, कविराज बोटे, तुकाराम विघ्ने, आबासाहेब बेडके, सुशील नन्नवरे, राहुल लबडे, विजय वाणी आदी उपस्थित होते. वाहतूक नियंत्रक अरुण दळवी ,श्रीनिवास शर्मा, विनायक तांबोळी, दत्तात्रय भापकर, बाबासाहेब पाटोळे आदी उपस्थित होते.
यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहाजवळील आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाच्या संत गाडगेमहाराज छात्रालयातील विद्यार्थ्यांनी मंगळवारी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेचा उपक्रम राबवला. गाडगेमहाराजांनी दिलेला सार्वजनिक स्वच्छतेचा मूलमंत्र आचरणात आणून विद्यार्थी झाडू घेऊन रस्त्यावर उतरले.
गाडगेमहाराजांच्या वेशभुषेतील एका विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी सहकार सभागृहापासून स्वच्छता फेरी काढली. स्वच्छतेबाबत काढलेली ही जागृती फेरी नगरकरांसाठी लक्षवेधी ठरली. स्वच्छता फेरी आटोपल्यानंतर छात्रालयाच्या आवारात पुण्यतिथीचा कार्यक्रम झाला.
अध्यक्षस्थानी सिताराम काकडे, विशाल पांडे, संस्थेतील विकास गवळी, मुख्याध्यापक जगन्नाथ बोडखे, बाबासाहेब लोंढे, मनीषा कोळगे, अधीक्षक बाबासाहेब पातकळ, सतीश काळे, संजय सकट, संभाजी आठरे, कविराज बोटे, तुकाराम विघ्ने, आबासाहेब बेडके, सुशील नन्नवरे, राहुल लबडे, विजय वाणी आदी उपस्थित होते. वाहतूक नियंत्रक अरुण दळवी ,श्रीनिवास शर्मा, विनायक तांबोळी, दत्तात्रय भापकर, बाबासाहेब पाटोळे आदी उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष अॅड शिवाजीराव काकडे यांच्या प्रेरणेने संस्थेच्या सर्व विद्यालयामध्ये गाडगे महाराजांची पुण्यतिथी याच पद्धतीने साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांवर सामाजिक बांधिलकीचे संस्कार हवेत ह्याच उद्देशाने असल्याचे त्यांनी सांगितले. वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर डिंक लाडू किटचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी नियमीत व्यायाम करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आले.
या भागात राबवली स्वच्छता मोहिम
विद्यार्थ्यांनी काढलेली स्वच्छता जागृती फेरी शहरातील बंगाल चौकी, ख्रीस्त गल्ली,कापड बाजार,कोर्ट गल्ली, माळीवाडा वेस माळीवाडा बस स्थानक, पुणे बस बुरुडगाव रोड, आनंद धाम, महात्मा फुले चौक, मार्केट यार्ड भागातून काढून स्वच्छता केली.
टाळ-पखवाजाच्या तालावर गायले भजन
स्वच्छता फेरीतील विद्यार्थी फेरी सुरू असतानाच हातात झाडू घेऊन परिसर स्वच्छ करत होते. त्याचवेळी फेरीत सहभागी इतर विद्यार्थी संत गाडगेबाबांचे आवडते ‘गोपाला गोपाला, देवकीनंदन गोपाला’ हे भजन टाळ-पखवाजाच्या तालावर गात होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.