आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:शारिरिक आरोग्याप्रमाणे विद्यार्थ्यांना मौखिक आरोग्य मिळण्याची गरज

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

समाजातील काहीशा दुर्लक्षित असलेल्या विद्यार्थ्यांना योग्य वैद्यकीय सेवा मिळायला हव्यात. विद्यार्थ्यांसाठी शारीरिक आरोग्याप्रमाणे मौखिक आरोग्य सेवाही मिळणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन डॉ. अतुल मडावी यांनी केले.

स्नेहबंध सोशल फाउंडेशन व साई डेंटल क्लिनिकच्या संयुक्त विद्यमाने तपोवन रोड येथील बालघर प्रकल्प व अभिनव बाल विकास शाळेत मोफत दंतचिकित्सा शिबीरात ४५ विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. याप्रसंगी डाॅ. माडवी बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष अमित खामकर, स्नेहबंध फाउंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे, भाजपा महिला आधाडीच्या अध्यक्षा ज्योत्सना मुंगी, बालघर प्रकल्पाचे संचालक युवराज गुंड, मुख्याध्यापिका सरला राळेभात, पूजा मडावी, हेमंत ढाकेफळकर, जान्हवी मुंगी, संजू लोखंडे, विद्या खेमणार, मोहिनी पालांदे आदी उपस्थित होते.

डॉ. मडावी म्हणाले, समाजातील दुर्लक्षित विद्यार्थ्यांना योग्य वैद्यकीय सेवा मिळायला हव्यात. विद्यार्थ्यांसाठी शारीरिक आरोग्याप्रमाणे मौखिक आरोग्य हे देखील गरजेचे आहे. त्यासाठी या दंत तपासणी शिबीराचे आयोजन केले असे सांगितले.

दंत तपासणी नंतर भंडारी सप्लायर्सचे संचालक रुपेश भंडारी यांच्या वतीने विद्यार्थ्यांना औषधांचे वाटप करण्यात आले. प्रास्ताविक युवराज गुंड यांनी तर आभार संजू लोखंडे यांनी मानले.विधाते म्हणाले, आजचे विद्यार्थी हे देशाचे भावी नागरिक आणि आधारस्तंभ आहेत. देशाची ही भावी पिढी शारीरिक आणि मानसिकदृष्टया अधिक सुदृढ असायला हवी, असे असे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...